nimgaon-har-ghar-tiranga
निमगाव म्हाळुंगीः शिरूर तालुक्याील निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान सांगता समारंभ देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला. शिवाय, ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील माजी सैनिकांना निमंत्रित करून त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम म्हणून त्यांना गावच्या वतीने प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, गट विकास अधिकारी महेश डोके, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सूर्यकांत पलांडे, भाजपा उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष शरदभाऊ बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सुदाम चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली आणि निमगाव म्हाळुंगीचे विद्यमान सरपंच यांच्या नेतृत्वा खाली निमगाव म्हाळुंगी गावा मध्ये साजरा करण्यात आला.
विद्या विकास मंदिर या ठिकाणी तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कांतीलाल टाकळकर, शाळेचे मुख्याध्यापक संजीव मांढरे, रमेश करपे, रमेश जाधव यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये आणि मुलींमध्ये आलेल्या पहिल्या तीन क्रमांकाला सरपंच बापूसाहेब काळे आणि ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, उपसरपंच ज्योतीताई चव्हाण आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले.
जिल्हा परिषद मराठी शाळेने गावात असणाऱ्या पेठे मधून तिरंगा यात्रा मोठया उत्साहामध्ये काढली होती. सदर यात्रेचे उदघाट्न म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रायचंद गव्हाणे, शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, उपमुख्याद्यापक मारुती निकम, अविनाश साकोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी ने गावातील ग्रामस्थांनासाठी सेल्फी पॉईंट तयार केला होता. या सेल्फी पॉईंट चे उदघाटन शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे माजी सभापती सीताबाई रणसिंग, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे, निमगाव म्हाळुंगीचे पोलीस पाटील किरण काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत च्या वतीने गावातील माजी सैनिकांना निमंत्रित करून त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम म्हणून त्यांना गावच्या वतीने प्रशस्ती पत्रक देऊन शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि निमगाव म्हाळुंगी चे सरपंच बापूसाहेब काळे, उपसरपंच ज्योतीताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले.
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान सांगता समारंभ देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला. यावेळी म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, शिरूर तालुक्याच्या माजी सभापती सीताबाई रणसिंग, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सरपंच बापूसाहेब काळे, ग्राम विकास अधिकारी गुलाबराव नवले, ग्रामपंचायत सर्व माजी सरपंच, आजी-माजी उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, गावातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…
निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण
निमगाव म्हाळुंगी येथील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात…
निमगाव म्हाळुंगीत दिवाळीचा एक दिवा सैनिकांसाठी
निमगाव म्हाळुंगीत अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दत्तक योजना
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…