मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावासह वहिनीने शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कारभारी कोळपे (वय ३८, रा. गुनाट, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असुन ७ जून २०२६ रोजी सकाळी १० च्या सुमारास फिर्यादी संदीप कोळपे घरी असताना त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब कारभारी कोळपे व वहिनी सोनाली भाऊसाहेब कोळपे हे घरासमोर आले.

यावेळी सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटार घरी का आणली, याबाबत दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. फिर्यादीनुसार, मोटार कोणालाही वापरु देणार नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत संदीप कोळपे यांना खाली पाडले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याच दरम्यान आरोपींनी दगड डोक्यात घालत दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर जखमी संदीप कोळपे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार भाऊसाहेब कारभारी कोळपे आणि सोनाली भाऊसाहेब कोळपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

4 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago