शिरुर (तेजस फडके): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी आपला मराठी बाणा जपत त्यांच्या मित्र परिवारासोबत लंडन शहर संसद चौकात भारतीय विद्यार्थी व इतर देशातील विद्यार्थ्यांसोबत मिळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी सर्व विद्यार्थांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी लंडनचा संसदभवन परिसर दणाणून सोडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण जगात परिचित असुन त्यांची युद्धनिधी आणि सर्वसमावेशक प्रशासकीय नैपुण्य यांमुळे शिवाजी महाराज हे जगातले आदर्श राजे ठरले आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या “गनिमी काव्याच्या” युद्धनीतीचा जगभरात अभ्यास केला जातो. त्यामुळे लंडन शहरात आपली भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यातील विद्यार्थी अँड संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यासाठी एकत्रित आले होते.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील अभ्यासक भारतात येतात आणि हीच महाराष्ट्राची परंपरा आम्ही जोपासत शिवाजी महाराज यांना लंडन संसद चौकात वंदन केले अशी माहिती अँड संग्राम शेवाळे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना दिली. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…
महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…
मुंबई: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात आज ऐतिहासिक नोंद झाली आहे. एकाच वेळी तब्बल १,४४० नवनियुक्त…
१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय…