मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून तब्बल १६ लाख ३३ हजार रुपयांचा कॉपर ट्यूबचा साठा चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मोठ्या चोरीमुळे औद्योगिक परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत नामदेव महादु गाडेकर (वय ३७, रा. मराठानगर, केडगाव, जि. अहिल्यानगर) यांनी शिरुर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७ ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या मागील बाजूच्या दरवाजातून प्रवेश करुन चोरी केली. यात चोरट्यांनी कंपनीत ठेवलेले तब्बल ६५ कॉपर ट्यूब बंडल (प्रत्येकी २२ किलो वजनाचे व किंमत २५,१२४ रुपये) असा एकूण १६ लाख ३३ हजार ६० रुपयांचा माल लंपास केला.

सुरक्षेतील त्रुटी उघड…

या कंपनीच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्यानेच ही मोठी चोरी घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरुन औद्योगिक वसाहतीमधील सुरक्षा यंत्रणा किती निष्काळजी आहे, हे अधोरेखित झाले आहे. सुरक्षारक्षकांची भूमिका काय होती, ते ड्युटीवर होते का, याचीही चौकशी सुरु असल्याची माहिती समजते.

संशयितांचा शोध सुरु…

या प्रकारामागे आतल्या गोटातील हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणातील कॉपर ट्यूब सहजपणे बाहेर नेणे अवघड आहे. कंपनीचे कामगार किंवा माजी कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का…? याचा पोलिस तपास करत आहेत.

उद्योग वर्तुळात भीतीचे वातावरण…

या घटनेनंतर शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योगपतींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरुर तालुक्यातील औद्योगिक परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी आणि कंपन्यांनी स्वतःची सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

शिरुर पोलिसांचा तपास सुरु….

या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन पुरावे गोळा केले असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व स्थानिक सूत्रांचा आधार घेतला जात आहे.

रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…

12 तास ago

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…

1 दिवस ago

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…

2 दिवस ago

सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…

2 दिवस ago

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी वेळीच द्या लक्ष

चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर…

3 दिवस ago