0%
Skip to content
रविवार, ऑक्टोबर 25, 2026
  • शिरुर तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक – तेजस फडके 9766117755 / 9423020103
Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

Shirur Taluka News | शिरूर तालुका न्युज

shirurtaluka.com : shirur taluka news

  • शिरूर तालुका
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • देश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • खव्वयेगिरी
  • थेट गावातून
  • मुलाखत
  • भविष्य
  • खूप काही+
    • आजचा वाढदिवस
    • आरोग्य
    • इतर
site mode button

ग्राहकांनो सावधान! केव्हाही रिकामे होईल आपले बँक खाते

मुख्य बातम्या
जानेवारी 17, 2023जानेवारी 17, 2023शिरूर तालुका टीम

शिरुर (अरुणकुमार मोटे): अनेकदा आपणांस एसएमएस आणि बनावट (फ्रॉड) फोन कॉलच्या माध्यमातून खोटे संदेश, विविध लिंक आणि फोन येत असतात. या फोनला जर प्रत्युत्तर कराल तर आपले बँक खाते क्षणार्धात खाली होऊ शकते. अशा अनेक घटना या आधीच्या काळातही घडल्याचे दिसून आले आहे. अशाच प्रकारे चक्क रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काही ग्राहकांना महाराष्ट्र बँक मधून बोलतोय अशा प्रकारचे टाकळीहाजी, शिरुर परीससरात फोन येत विविध प्रश्नांच्या बाबतीत विचारणा करत माहिती मागवण्यात येत होती. यामध्ये समोरील व्यक्ती हिंदी भाषेतून बोलत मी महाराष्ट्र बँकेतून बोलतोय, आपल्या खात्याची केवायसी करण्यासाठी आम्हास आपले आधार क्रमांक, पॅन क्रमांक याबद्दल माहिती हवी आहे.

तसेच आपल्या खात्यास आधार लिंक नाही. आपला मोबाईल नंबर खात्यास दिसत नाही. आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी पासवर्ड आम्हास सांगावा अशा प्रकारे बनावट फोन आल्याने अनेक ग्राहकांचा गोंधळ उडाला. अशा प्रकारे फोन आल्यास अनेकजणांना हे फोन संशयास्पद वाटल्याने त्यांनी सावधानता बाळगली. पण सर्वच लोकांना संबंधित कॉल, लिंक, मेसेजेस खोटे अथवा बनावट आहे हे कळेलच असे नाही. तसेच या बाबतीत विचारणा करण्यासाठी बँक केव्हाही आपल्या ग्राहकांना संपर्क करत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांनी या बनावट कॉल ला कोणताही प्रतिसाद न देता थेट आपल्या नजीकच्या शाखेत जाऊन संपर्क साधणे गरजेचे आहे.

अशा संपर्कांना कोणताही प्रतिसाद देऊ नये व खात्यासंबंधी गोपनीय बाबी फोन वर कोणास सांगू नये अशा प्रकारचे संदेश देत बँक आपणास वारंवार सूचित करत असतात. यामुळे ग्राहकांनी सतर्कता बाळगून आपल्या बँक खात्याची काळजी घ्यावी आणि आपल्या नजीकच्या बँक शाखेस जाऊन भेट देत समक्ष माहिती घ्यावी. अन्यथा आपले बँक खाते रिकामे होऊन मोठे नुकसान होऊ शकते.

Tagged accountanytimebankbewarecustomersemptyNewsshirurtaluka

पोस्टचे नॅव्हिगेशन

आमदार अशोक पवारांचे सुडाचे राजकारण
पुणे नगर महामार्गावर प्रवासी महिलेचा विनयभंग

संबंधित पोस्ट

शिरुरमध्ये बिगरपरवाना बेकायदेशिर मांडूळ प्रजातीचा वन्यजीव बाळगणा-या दोघांना घेतले ताब्यात

फेब्रुवारी 1, 2025फेब्रुवारी 1, 2025शिरूर तालुका टीम

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

डिसेंबर 14, 2022शिरूर तालुका टीम
Aamdabad-Video

शिरूर! शिक्षिकेचा पती पालकावर भडकला; पाहा दोन्ही Video…

डिसेंबर 15, 2025शिरूर तालुका टीम

अलीकडील पोस्ट

  • सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
  • शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त
  • शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा
  • शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका
  • Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

Popular Categories

  • आरोग्य (2,408)
  • इतर (155)
  • क्राईम (1,744)
  • खव्वयेगिरी (4)
  • थेट गावातून (18)
  • देश (46)
  • भविष्य (370)
  • मनोरंजन (175)
  • महाराष्ट्र (5,676)
  • मुख्य बातम्या (2,273)
  • मुलाखत (23)
  • राजकीय (1,008)
  • शिरूर तालुका (2,936)

आजचा प्रश्न

शिरूर तालुक्यात निवडणूकीदरम्यान पैसा आणि ड्रग्जचा वापर झाला आहे, असे आपणास वाटते काय?

View Results

Loading ...
  • Polls Archive

शिरुरतालुका बद्दल

शिरूर तालका डॉट कॉम बद्दल थोडक्यात... www.shirurtaluka.com या वेबसाईटचे उद्घाटन २०११ रोजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले आहे. राज्यातील पहिली तालुक्याची वेबसाईट असून, शिरूर तालुक्यातील प्रत्येक घडामोड वेबसाईटवर वाचायला मिळते.

FOLLOW US

काही निवडक श्रेणी

  • शिरूर तालुका
  • थेट गावातून
  • क्राईम
  • राजकीय
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • देश
  • मुलाखत

ताज्या घडामोडी

  • सिस-पे आर्थिक फसवणूक प्रकरणात शिरूरच्या तलाठ्याला अटक; २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
  • शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त
  • शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा
  • शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका
  • Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?

Like Us On Facebook

Loading...
© 2022 ShirurTaluka.com. All Rights Reserved. | Theme: News Portal by Mystery Themes.
error: Content is protected !!