मुख्य बातम्या

धारिवाल कुटुंबाकडून विठ्ठल मंदिर गणपतीला चांदीचा मुकुट अर्पण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मानाचा चौथा समजला जाणारा श्री विठ्ठल मंदिर गणपती उत्सव यंदा खास ठरला आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल व त्यांचे सुपुत्र आदित्य धारिवाल यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वक पार पडली. या प्रसंगी धारिवाल कुटुंबाकडून पाच किलो वजनाचा भव्य चांदीचा मुकुट गणपती बाप्पाला अर्पण करण्यात आला.

दानशूर वृत्ती, समाजाभिमुख कार्य व देवभक्ती यासाठी ओळखले जाणारे धारिवाल कुटुंब गेली तीन पिढ्यांपासून शिरूरकरांच्या हृदयात घर करून आहे. या पिढीजात नात्याची प्रचिती आज शिरूरकरांना पुन्हा अनुभवायला मिळाली.

कुंभार आळी येथून गणपतीची सुरेख मूर्ती पारंपरिक शास्त्रीय वाद्यांच्या गजरात नगरातील प्रमुख रस्त्यांवरुन मिरवणुकीत आणण्यात आली. आदित्य धारिवाल यांनी मुकुटाचे वहन करून मिरवणुकीत अग्रभागी स्थान मिळवले, तर प्रकाशशेठ धारिवाल व शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह मान्यवर पायी चालत सहभागी झाले.

या भव्य मिरवणुकीस शिरूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुंभार आळीत मिरवणुकीचे स्वागत मोठ्या आतषबाजीने करण्यात आले. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या क्षणी वातावरणात “गणपती बाप्पा मोरया” चा जयघोष दुमदुमला.

या प्रसंगी प्रकाशशेठ धारिवाल म्हणाले,गणपती उत्सव हा शिरूरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आमच्या कुटुंबाचीही गणरायावर अपार श्रद्धा असून ही परंपरा आम्हाला जपायची आहे.”तर आदित्य धारिवाल यांनी प्राणप्रतिष्ठेच्या आनंदाविषयी बोलताना व्यक्त केले, “गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मान लाभल्याने आम्हाला मनस्वी आनंद व प्रसन्नता लाभली आहे.”

या प्रसंगी नगरसेवक मुज्जफर कुरेशी, हाफिज बागवान, एजाज बागवान, किरण पठारे, बाळासाहेब जामदार, विजय शिर्के, संतोष शिंदे, दत्तात्रय काळे, संतोष जामदार, संभाजी जामदार, पोपट जामदार, बाबुराव जामदार, राजकुमार जामदार, वसीम शहा, नितीन जामदार, अमित शिर्के, विशाल भावटणकर, श्रीतोष अभंग, मयूर जामदार, शरद जामदार, सनी थोरात, चेतन जामदार, विक्रम जामदार, नितीन शिर्के, रोहन जामदार, नरेंद्र कडूस्कर, पप्पू शिर्के, कुणाल क्षीरसागर, प्रशांत आतकर, चरण जामदार, निलेश कुंभार यांच्यासह कुंभार आळीतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अक्षय शिर्के यांनी केले. प्रास्ताविक योगेश जामदार यांनी तर आभार प्रदर्शन शंकर जामदार यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

4 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

4 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

4 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

4 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago