शिरूर तालुका

शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा जल्लोष

 

सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सलग दुसरा विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे): “बोल बजरंगबली की जय!” या जयघोषात शिरूर शहर दुमदुमले, कारण यंदाही शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा थरार रंगला. यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन व स्वराज्य रक्षक फाउंडेशन शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अद्वितीय महिला दहीहंडी उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्या पत्नी मनीषाताई कटके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण, दीपप्रज्वलन आणि नारळ फोडून करण्यात आली. यावेळी मनीषाताई कटके म्हणाल्या, “महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध करण्याची ही खरी संधी आहे. पुढील काळात अधिकाधिक शाळांनी व संघांनी या दहीहंडीत सहभागी होऊन शिरूर तालुक्याचे नाव मोठे करावे.’ या भव्य उत्सवात सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेज शिरूर, कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव,सिताबाई चिटे बी फार्मसी कॉलेज शिरूर, आयटीकेबी कराटे क्लास आदी पाच संघांनी सहभाग घेतला.

पारंपरिक जल्लोषात सुरुवात झालेल्या या दहीहंडीला प्रत्येक संघाने मानवंदना दिली. अखेर, गेल्या वर्षीप्रमाणेचसीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनीनी थरारक पद्धतीने दहीहंडी फोडली आणि सलग दुसऱ्या वर्षी विजय मिळवत तब्बल २१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. विजयी संघासह सर्व सहभागी संघांचा मानाच्या ट्रॉफीने गौरव करण्यात आला. या सोहळ्याला आमदारपत्नी मनीषा कटके, माजी नगरसेविका हिराबाई ढोबळे, प्राजक्ता ढोबळे, शोभना पाचंगे, मनीषा कालेवर, स्नेहलता यादव, आयोजक संपादक शोभा परदेशी, यशस्विनी वेल्फेअरच्या सचिव नम्रता गवारी आदींसह सामाजिक, राजकीय व विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.या दही हंडी कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे असे मत यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशनच्या नम्रता गवारे यांनी मांडले.

या कार्यक्रमाच्या आरोग्य सुरक्षेसाठी शिरूर येथील स्त्री हॉस्पिटलने अॅम्बुलन्स, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून दिला होता. तसेच माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांचे विशेष सहकार्य लाभले. दहीहंडीच्या पंच म्हणून अॅड, काजल धोरात व अमृत झांबरे यांनी काम पाहिले. तर कार्यक्रमाचे उत्कट सूत्रसंचालन संतोष झंजाड व किरण झांबरे यांनी केले. शिरूरमध्ये महिलांसाठी, महिलांनीच आयोजित केलेल्या या दहीहंडीचा उत्सव हा महाराष्ट्रातील एक आगळावेगळा उपक्रम ठरत असून, यातून “महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत हा संदेश संपूर्ण समाजापर्यंत पोहोचला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago