शिरूर (किरण शेलार पिंगळे): रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पूरस्कार २०२५ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यातील योगदान तसेच समाजकार्यातील सहभाग अधोरेखित करत गेली नऊ वर्षे हे पुरस्कार दिले जात असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
शिरूर पोलिस स्टेशनचे पी.एल. संदेश केंजळे साहेब यांनी शिक्षकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. अॅड. सुभाष पवार (शहर विकास आघाडी), कल्याण कोकाटे सर यांनी मनोगते व्यक्त केली. तर शिरूर गटशिक्षण अधिकारी श्री. बाळकृष्ण कळमकर साहेब यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत पुरस्कार प्राप्तांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांना आदर्श गटशिक्षण अधिकारी पुरस्कार प्रदान करून विशेष गौरविण्यात आले. शिरूर हवेलीचे आमदार मा. कार्यसम्राट श्री. अशोक बापू पवार यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात अनेक मुख्याध्यापक व शिक्षकांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन आदर्श शिक्षिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पी.एल. संदेश केंजळे, पंचायत समितीचे धोत्रे साहेब, अॅड. सुभाष पवार, श्री. संजय शितोळे (शितोळे करिअर अकॅडमी), श्री. यशवंत कर्डिले (उपसरपंच, शिरूर ग्रामीण), श्री. शामकांत वर्पे, अॅड. रविंद्र खांडरे, श्री. संतोष शिंदे (सरपंच, अण्णापूर), शंकर रासकर, केशव शिंदे (अण्णापूर ग्रा.सदस्य), पैलवान अशोक पवार, श्री. संतोष थेऊरकर (युवा उद्योजक), साधना शितोळे, शर्मिला निचित, गीता आढाव, शीतल शर्मा, दुर्गा ननवरे, आढाव भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा सौ. राणी कर्डिले यांनी केले. सूत्रसंचालन अर्जुन निचित सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. संतोष थेऊरकर यांनी मानले.