महाराष्ट्र

म्हणून अजित पवार यांना ‘दादा’गिरी अंगलट…

मुंबई: अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला. ‘दादागिरी’ विरोधात टीकेची चौफेर झोड उठल्याने अजित पवार यांनी अखेर शुक्रवारी खुलासा करीत घडल्या गोष्टीवर पांघरूण घातले.

सोलापूर जिल्ह्यातील कुई गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी अंजना कृष्णा गेल्या होत्या. त्यावेळी एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना कॉल लावून इकडे बोला असे म्हणत मोबाइल अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. “मैं डीसीएम अजित पवार बोल रहा हू. कारवाई बंद करो, मेरा आदेश है” असे म्हटल्यावर अंजना कृष्णा यांनी ‘मेरे फोन पर कॉल करो’ असे उत्तर दिल्यावर संतापत अजित पवार यांनी ‘तुम पे अॅक्शन लूंगा, इतनी डेअरिंग है तुम्हारी’, असे म्हटले होते.

बेकायदा कामावर कारवाई थांबवल्यावर कायद्याची भाषा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलिस दलाबद्दल, तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.

आ. अमोल मिटकरी यांचे यूपीएससीला पत्र

अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांची शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करावी, अशी मागणी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली आहे. अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून, आयोगाच्या स्तरावर कागदपत्रांची सखोल तपासणी करून संबंधितांना अवगत करण्यात यावे, असे मिटकरी यांनी आयोगाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अंजना कृष्णा यांची चौकशी कशासाठी, कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून का, असा प्रश्न केला आहे.

सरकारी कामात अडथळा २० जणांविरुद्ध गुन्हा

सरकारी कामात अडथळा निर्माण करीत बेकायदेशीर जमाव जमवून गोंधळ घातल्या प्रकरणात माढा तालुक्यातील कुई येथील २० जणांविरुद्ध कुडूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल नितीन श्रीपती गोरे यांनी फिर्याद दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago