शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता.शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेला धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, कर्मचारी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी परिचारिका विद्या गिरीगोसावी यांनी बाह्यरुग्ण विभागातील रूग्णांसंदर्भात माहिती देण्यासाठी डॉ. राजेश जाधव यांना फोन केला असता, त्यांनी फोनवरच अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यानंतर रुग्णालयात उपस्थित होऊन त्यांनी इंजेक्शन विभागात काम करत असलेल्या गिरीगोसावी यांना धमकावले, तसेच “तुझी लायकी नाही येथे बसण्याची” असे म्हणत अपमानित केले.
या प्रकरणी गिरीगोसावी यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनीही एकत्र येत डॉ. जाधव यांच्या अरेरावी व अवमानकारक वागणुकीविरोधात वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दिली
तक्रारीची गंभीर दखल घेत, प्राथमिक चौकशीनंतर डॉ. जाधव यांना निलंबित करण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अतूल नागरे यांनी सांगितले. मात्र, निलंबनानंतरही ते रुग्णालयाच्या निवासस्थानातच वास्तव्य करत असून कर्मचाऱ्यांना मनस्ताप देत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
डॉ. जाधव यांच्यावर यापूर्वीही कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन केल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने अधिक ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी कर्मचारी व स्थानिकांकडून होत आहे.या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण असून, रुग्णसेवेवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. आता या प्रकरणी आरोग्य विभाग काय पावले उचलतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…