आरोग्य

मुतखड्यावर घरगुती उपाय

1) मुतखडयांवर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. मुतखडयांचा त्रास असल्यास एकदा तरी तज्ज्ञाकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ताबडतोब शस्त्रक्रिया करणे आवश्यक नसल्यास निरनिराळे आयुर्वेदिक उपाय करून पाहता येतील. वरुणादि काथ हे औषध यासाठी उपयुक्त आहे. हे औषध सकाळ सायंकाळ 2-2चमचे घ्यावे.

2) मुतखडयांचा उपचार आणि प्रतिबंध या दोन्ही दृष्टींनी भरपूर पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे व शक्‍यतो विहिरी व बोअरचे (क्षारयुक्त) पाणी पिणे टाळावे.

3) कडुलिम्बाच्या पानाची राख २ ग्राम पाण्याबरोबर नियमित खाल्याने मुतखडा विरघळून जातो.

4) जर खडा लहान असेल आणि जास्त जुना नसेल तर मेहंदी चे साल वाटून चूर्ण करावे आणि सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्याने मुत्खावा विरघळतो.

5) पुनर्नवा वनस्पतीही मुतखडयावर उपयुक्तआहे. पुनर्नवा (खापरखुटी, वसूची भाजी) ही पावसाळयापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी आढळते. या वनस्पतीची मुळासकट बिनतिखट चटणी (50 ग्रॅम) रोज जेवणात असावी. ओली वनस्पती काढून सावलीत वाळवून नंतर वापरता येते.

6) या उपायांबरोबरच टोमॅटो, कोबी, अळू,, इत्यादी भाज्या जेवणातून वर्ज्य कराव्यात.

7) पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे (सराटे) यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण दोन ग्रॅम, रोज एक वेळ (सकाळी रिकाम्या पोटी) पाण्याबरोबर द्यावे. त्यानंतर चार-पाच तास तोंडाने काहीही न घेण्याची सूचना द्यावी. याप्रमाणे दीड महिना रोज उपचार करावेत. पाच-सहा महिन्यांनंतर परत एकदा महिनाभर हाच उपाय करा.

(सोशल मीडियावरून साभार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

11 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

11 तास ago