मुख्य बातम्या

शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, ३ नवीन जागांची वाढ

नागरिकांना हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची उलटी गणती सुरू झाली असून, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी शिरूर नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. या रचनेवर १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करताना मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले की, प्रारूप प्रभाग रचना नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच नगरपरिषदच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती/सूचना लेखी स्वरूपात आवक-जावक विभागामध्ये सादर कराव्यात. हरकती नोंदवणाऱ्या नागरिकांना स्वतंत्रपणे सुनावणीसाठी वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, मात्र ३१ ऑगस्टनंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत २१ नगरसेवक निवडले गेले होते. यंदा ३ जागांची वाढ करण्यात आली असून, एकूण २४ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी १२ प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

प्रभाग रचना कायम झाल्यानंतर याच प्रभागांवर आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत सर्वसाधारण, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच महिलांसाठीचे आरक्षण निश्चित केले जाईल.

निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेक इच्छुकांनी नगरपरिषदेच्या परिसरात चळवळ सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर नगर परिषदेतील संभाव्य प्रभाग रचनेचा नकाशा आणि माहितीपत्रक नागरिकांच्या अवलोकनासाठी लावण्यात आले आहे. नागरिकांनी या रचनेचा अभ्यास करून, काही त्रुटी अथवा दोष असल्यास ३१ ऑगस्टपूर्वी लेखी हरकती व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago