मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच…

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर महामार्गावरील विविध हॉटेल्स नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहेत. पण एखाद्या अनोळखी हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यापुर्वी विचार करा. कारण, शिरूर तालुक्यातील विविध हॉटेलमध्ये गोमांस अथवा विविध प्राण्यांचे मांस ग्राहकांना खायला देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असे इतर प्राण्यांचे मांस दिल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकाने चिकनची पार्सल ऑर्डर घेतली होती. त्यानंतर सहकाऱ्यांसोबत चिकन खात असताना त्यांना चिकनचा पाय हा वेगळ्याच प्राण्याचा असल्याचा संशय आला. यानंतर त्यांनी हॉटेलचे बिल व चिकनचा फोटो काढला आणि व्हिडिओ तयार केला. तसेच तो संबंधित फोटो आणि व्हिडिओ www.shirurtaluka.com च्या प्रतिनिधिकडे पाठवले. आपल्याला दिलेल्या चिकन मधील पाय हा नक्कीच कोंबडीचा नाही, असा दावा त्या ग्राहकाने केला आहे. आम्ही नेहमची चिकन खातो. परंतु, प्रथमच अशा प्रकारचा पाय आम्हाला खायला मिळाला आहे. आमच्या सारख्या इतर ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून प्रसारमाध्यमांशी संपर्क साधल्याचे ग्राहकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

 

त्यानंतर www.shirurtaluka.com च्या प्रतिनिधीने शहानिशा करण्यासाठी हॉटेलच्या बिलावर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ‘आम्ही चिकनच दिले आहे. परंतु, त्यांनी मध्ये काही केले असल्यास आम्हाला माहित नाही.’ दरम्यान, संबंधित चिकनचा पाय हा अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागाकडे तपासण्यासाठी देण्यात येणार आहे. तपासणीचा अहवाल हाती आल्यानंतर खरा प्रकार समोर येईल.

 

हॉटेल मध्ये ‘मांसाहार’ खाताना काळजी घ्या…

शिरुर पोलिसांनी काही दिवसांपुर्वी गोमांस वाहतुक करताना पकडले होते. संबंधित गोमांस हे शिरुर तालुक्यातील विविध हॉटेलमध्ये विक्रीसाठी आणले असल्याचे उघड झाले आहे. यामुळे मांसाहार करणाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच अनेक हॉटेल मध्ये दर्जाहिन मटण, चिकन ग्राहकांना खाऊ घातले जाते. याकडे ग्राहकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

 

शिरुर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिरुर तालुक्यात काही दिवसांपुर्वी रांजणगाव गणपती येथील एका स्वीट होम मधील मिठाई मध्ये मेलेली अळी सापडली होती. त्यावेळेस www.shirurtaluka.com ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करत याविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर आता सणसवाडी येथे एका हॉटेल मध्ये चिकन मध्ये वेगळ्याच प्राण्याचा पाय आल्याचा संशय ग्राहकाने व्यक्त केला आहे. तसेच शिरुर तालुक्यातील अनेक हॉटेल मध्ये गैरप्रकार चालु असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘सिद्धिविनायक चोरीप्रकरणी मला माहिती नाही’; बांकीपूर पराभवानंतर संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवावरून केंद्र…

5 मिनिटे ago

खड्ड्याने घेतला टीडीआरएफ जवानाचा जीव! अनेकांचे प्राण वाचवणारा विकास गोरे काळाच्या पडद्याआड

अपघातानंतरच खड्डा बुजवला; पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी ठाणे : संकटाच्या…

10 मिनिटे ago

पेट्रोल-डिझेल निर्यात महागली! केंद्राचा मोठा निर्णय; ATF वरही शुल्कवाढ

पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…

1 तास ago

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! श्रीकांत शिंदेंविरोधात लढलेल्या वैशाली दरेकर-राणेंचा राजीनामा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून…

1 तास ago

‘सावजी’वरून तुकाराम मुंढे वादाच्या भोवऱ्यात; माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा; सावजी समाजाचा इशारा

मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस; पक्षघटनेतील बदलांवर मागवली महत्त्वाची कागदपत्रे

सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…

1 तास ago