मुख्य बातम्या

महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश; चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा

बारामती (प्रतिनिधी) वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले. आज बुधवार (दि ९) बारामती येथील ऊर्जाभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी बोलताना खंदारे म्हणाले, चालू आर्थिक वर्षात बारामती परिमंडलाची लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांची मार्च अखेर ४४ कोटी रुपये असलेली थकबाकीची रक्कम १४४ कोटींवर गेली आहे. हि रक्कम वसुल करण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा तयार करुन त्यावर काम करावे लागेल. शिवाय चालू बिले शंभर टक्के अधिक थकबाकी वसूल करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. या उद्दिष्टपूर्तीसाठी जनमित्रांपासून वरिष्ठ अभियंत्यापर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे.

 

आपल्या कामांचा आलेख हा नेहमी चढताच असला पाहिजे. प्रधानमंत्री सुर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी अनेक लोकाभिमुख योजना महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ मुळे शेतीला दिवसा वीज देणे शक्य होणार आहे. त्याकरिता ह्या योजनांच्या कामांना गती द्या. तसेच मा. वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानकांनुसार वीज कनेक्शन वेळेत देण्याचे व तक्रार निवारण करण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी यावेळी केल्या.

 

या बैठकीला मुख्य अभियंता अंकुश नाळे यांचे प्रमुख उपस्थितीसह अधीक्षक अभियंते दीपक लहामगे (बारामती), बाळासाहेब हळनोर (सातारा), सुनील माने (सोलापूर), सहा. महाव्यवस्थापक (वि.व ले.) सौ. कीर्ती भोसले, सहा. महाव्यस्थापक (मासं) धैर्यशील गायकवाड व सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

शिरुर तालुक्यात ‘नॉनव्हेज’ खाताय…? मग इकडे लक्ष द्याच

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

23 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago