शिक्रापूर (शेरखान शेख) शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिक्रापूरच्या सरपंच रमेश गडदे यांना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना ताजी असताना आता कोरेगाव भीमा येथील एका युवकाला दुकानात घुसून जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शुभम वाळके यांच्यासह चौघांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
कोरेगाव भीमा येथील जयदीप उर्फ राकेश पोटे हा त्याच्या कुशनचे दुकानात असताना एक इसम सायंकाळच्या सुमारास दुचाकीचे सिट कव्हर बसवण्यासाठी आला. मात्र जयदीप याच्या पत्नीने त्याला औषध घेऊन येण्यास सांगितल्याने जयदीप घरी गेला. त्यामुळे दुचाकीला सीट कव्हर बसवण्यास उशीर झाल्याने सदर दुचाकी चालक शुभम वाळके याने जयदीपला शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. त्याचवेळी शुभम याने त्याच्या काही मित्रांना फोन करुन बोलावून घेतले त्यावेळी त्याचे तीन मित्र सदर ठिकाणी आले त्यांनी देखील दुकानात घुसून जयदीपला जातीवाचक, शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यावेळी जयदीपच्या मामाचा मुलगा विशाल कांबळे भांडणे सोडवण्यास आला असता त्याला देखील जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
घडलेल्या प्रकाराबाबत जयदीप उर्फ राकेश विजय पोटे वय २१ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी शुभम वाळके रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे तसेच तीन अनोळखी युवक ( पूर्ण नाव पत्ता माहीत नाही ) यांच्या विरुद्ध मारहाण तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याने ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी हे करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…
पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…
थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…
मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…
शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…
अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…