मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एका प्लॉटिंग खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायिकाला त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या तसेच व्यवसायिकाचे सर्व आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या विश्वासु कर्मचाऱ्यानेच तब्बल ७१ लाख ६२ हजार ७७९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रांजणगाव गणपती (ता. शिरुर, जि. पुणे) येथील “पृथ्वीराज उद्योग समूह” या कार्यालयात हिशोब ठेवण्याचे काम पाहणारा गणेश भिमराव थोरात (रा. रांजणगाव, मूळ रा. संभाजीनगर) यानेच ही मोठी आर्थिक अफरातफर केली असुन विश्वासाने कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्यानेच तब्बल ७१ लाख ६२ हजार ७७९ रुपयांची फसवणूक करत मालकाची मोठी आर्थिक फसवणुक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून “घरका भेदि लंका ढाये” याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

याबाबत खरेदी-विक्री व्यवसायिक शरद भाऊसाहेब फंड (वय ४०), रा. फंडवस्ती, रांजणगाव गणपती यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या “पृथ्वीराज उद्योग समूह” या कार्यालयात हिशोब ठेवण्याचे काम पाहणारा कर्मचारी गणेश भिमराव थोरात (रा. रांजणगाव, मूळ रा. संभाजीनगर) यानेच ही मोठी आर्थिक अफरातफर केली असुन दि. १४ नोव्हेंबर २०२४ पासून हा सर्व प्रकार सुरु होता. प्लॉटिंग खरेदी विक्रीच्या बुकिंगमधून जमा झालेली ५५ लाख ९६ हजार ८७९ रुपये तसेच ऑफिस खर्च व कामगारांच्या पगारासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्डवरुन ५ लाख ५३ हजार ४०० रुपये आणि रोख स्वरुपातील १० लाख १२ हजार ५०० अशी एकूण ७१ लाख ६२ हजार ७७९ रक्कम आरोपीने अपहार केल्याचे समोर आले आहे.

विशेष धक्कादायक बाब म्हणजे, ही रक्कम आरोपी गणेश थोरात याने स्वतःकडे न ठेवता त्याचा भाऊ अर्जुन भिमराव थोरात याच्या नावावर असलेल्या कोटक महिंद्रा आणि एचडीएफसी बँकेच्या खात्यांमध्ये वळवली. त्यामुळे हा प्रकार पुर्वनियोजित कट असल्याचा संशय अधिक बळावला आहे. फिर्यादी शरद फंड यांनी विश्वासाने आर्थिक व्यवहाराची जबाबदारी गणेश थोरात याच्याकडे सोपवली होती. मात्र त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने हळूहळू रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फिर्यादी फंड यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुक तसेच अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहेत. सदर आरोपींनी नेमक्या किती कालावधीत आणि कोणत्या पद्धतीने पैसे वळवले, तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरु आहे.

इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने रांजणगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एखाद्या कार्यालयात काम करणाऱ्या “विश्वासू माणसानेच मालकाला असा गंडा घालणे हि गंभीर बाब असून अशा आरोपींवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

Video! शिरूर तालुक्यातील सविंदणे गावात हवेत गोळीबार; गुन्हा दाखल

Video: गुनाट गावातील गारपिटीनंतर गुणवंतवाडी सात दिवस अंधारात; शेतकरी त्रस्त

Video: शिरूरचे दोन्ही आजी-माजी आमदारांनी गुनाट गावाला भेट देत केली गारपिटीची पाहणी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

14 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

21 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago