क्राईम

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील ‘जीत ढाब्या’समोर कारला कंटेनरचा धक्का लागल्याच्या रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण करत दोघांनी मालाने भरलेला कंटेनर पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कंटेनर चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने कंटेनर (क्रमांक HR 65 B 0697) घेऊन जात होते. शिक्रापूर परिसरात अचानक एक कार कंटेनरसमोर आल्याने तिला कंटेनरचा किरकोळ धक्का लागला. यावरून कारमधील दोघांनी खाली उतरून चालक अंकुश यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरोपींनी कारच्या नुकसानीसाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कंटेनर पेटवून देण्याची धमकी त्यांनी दिली. अंकुश शर्मा यांनी “कंटेनरमध्ये माल आहे, कृपया तो पेटवू नका” अशी विनंती केली. मात्र आरोपींनी त्यांना पुन्हा मारहाण केली. आरोपींच्या दहशतीमुळे चालक जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्यानंतर आरोपींनी कंटेनरला आग लावून दिली आणि आपल्या कारसह तिथून पळ काढला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कंटेनरचे मोठे नुकसान झाले होते. चालक अंकुश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Video! पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर बस जळून खाक…

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

Video: शिरूर तालुक्यात गोठ्याला मध्यरात्री भीषण आग; बैलगाडा शर्यतीतील दोन बैल होरपळले…

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

6 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

6 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

7 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

7 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

7 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

7 तास ago