मुख्य बातम्या

शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात तरुणाईला विळखा घालणाऱ्या ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या काळ्या बाजारावर अखेर पोलिसांनी जबरदस्त घाव घातला आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार (दि 7) रोजी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना अक्षरशः रंगेहाथ पकडत सुमारे १ लाख ४ हजारांचा घातक अमली साठा जप्त केला आहे. 

‘पानटपरी’वर सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार…

शिरुर हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गालगत असलेल्या “एम्पायर” नावाच्या पानटपरीवरुनच ‘एमडी’ ड्रग्जचा उघडपणे व्यवहार सुरु होता. तरुणांना सहज गाठून “ओळखीच्या ग्राहकांना” हा विषारी माल विकला जात असल्याची खात्रीशीर माहिती ‘एटीएस’ ला मिळताच सापळा रचण्यात आला.

वेशांतर करत ‘एटीएस’ने साधला अचूक डाव…

गेल्या काही दिवसांपासून एटीएस पथकाने वेशांतर करुन रांजणगाव-शिरुर परिसरात गुप्त हालचाली सुरु ठेवल्या होत्या. योग्य क्षण साधत पोलिसांनी छापा टाकला आणि साहील संदीप करंजुले (वय २०) व ओंकार संजय धावडे (वय २३) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून विक्रीसाठी साठवलेले एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता…?

या दोघांवर शिरुर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना हा ड्रग्ज पुरवठा कोण करतंय…? या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण…? तसेच एमआयडीसी परिसरात किती खोलवर जाळं पसरलं आहे…? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलिसांच्या तपासात मिळणार असल्याचीही शक्यता आहे. तपास जसजसा पुढे सरकेल, तसतसे मोठे धक्कादायक खुलासे होण्याचीही शक्यता आहे.

तरुणाई उद्ध्वस्त; प्रशासनाची झोप उडाली…

शिरुर आणि रांजणगाव परिसरात ‘एमडी’ सारख्या घातक ड्रग्जचा शिरकाव झाल्याने परिस्थिती भीषण बनली आहे. कॉलेज तरुण, कामगार आणि बेरोजगार युवक या विळख्यात अडकत असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य, करिअर आणि कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामीण भागातही ड्रग्जची कीड पसरत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

एटीएसचा इशारा… ‘ड्रग्ज माफियांना आता सुट्टी नाही’

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक, तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, राहुल भवर, पवन तायडे यांच्या पथकांने केली आहे. 

शिरुर तालुक्यात लाखोंची फसवणुक; विश्वासू कर्मचाऱ्यानेच मालकाला घातला गंडा

शिरुर; माता नव्हे तु वैरीणी! मातृत्वाला काळिमा फासत अकरा महिन्याच्या चिमुकल्याचा खून

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

1 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

1 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

1 तास ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

1 तास ago

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…

1 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये…

1 तास ago