मुख्य बातम्या

रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे कचऱ्याचे साम्राज्य

शिरुर:- शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतच्या हद्दीत रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा येथे आसपासचे रहिवासी मोठया प्रमाणात कचरा टाकत असल्यामुळे कचऱ्याचे ढीग साठले असुन रस्त्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे त्रास होत असुन ग्रामपंचायतने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतची हद्द मोठी असून काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या दोन ते तीन दिवसांनी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे रामलिंगच्या बाजूला राहणारे रहिवासी घरातील सर्व ओला-सुका कचरा रामलिंग-शिरुर रस्त्यावर खारओढा या ठिकाणी टाकत असून त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साठत आहे. तसेच हे ढिग साठल्याने रात्रीच्या वेळेस या ठिकाणी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो कचरा पेटवुन दिला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना या धुराचा त्रास होत आहे.

याबाबत शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पोपट केदारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी ग्रामपंचायतची घंटागाडी ठराविक वेळेत उभी करणार आहोत. तसेच लोकांनी रस्त्यावर किंवा इतरत्र कुठे कचरा टाकू नये त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही फ्लेक्स लावून जनजागृतीही करत आहोत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

16 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago