क्राईम

शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांचा हैदोस; दुचाकीवरून आले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये पुन्हा सोनसाखळी चोरांनी डोके वर काढले आहे. एका महिलेच्या गळयातील १,२०,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. महिलेने तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर शहराच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी वारंवार हैदोस घातला असून, यापुर्वी ७ते ८ वेळा महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. रामलिंग ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर टु व्हिलरवर आलेल्या दोन चोरटयांनी उज्वला प्रवीण पाटील (वय 35 वर्ष ) या महिलेच्या गळयातील १,२०,००० रु. किमतीचे सोन्याचे दोन तोळ्याचे मिनी गंठण, सोन्याच्या पट्टीचे मनी मंगळसूत्र गळ्यातून ओढून चोरून नेले आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, मंगळवारी (ता. २५) सकाळी ०७ : ३०वा.चे सुमारास शिरूर गावच्या रामलिंग हद्दीत ओमरुद्रा रेसिडेन्सी येथे अंतर्गत रोडवर उज्वला पाटील या किराणा दुकानातून साहित्य घेऊन परत घराकडे पायी जात होत्या. यावेळी समोरून स्प्लेंडर मोटर सायकल नंबर एम .एच. २२ ए .क्यू ९०७० वरून दोन अनोळखी आले. अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील होते. एकाच्या अंगात काळा रंगाचा शर्ट, काळी पॅन्ट व दुसऱ्याच्या अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातलेली, गळ्याला काळा रुमाल बांधलेला यांनी समोरून येऊन मोटार सायकल स्लो करून मोटरसायकल वरील मागे बसलेल्या एकाने उज्वला पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मिनी गंठण किंमत अंदाजे रू १, २०, ००० रुपये किमतीचे दागिने हाताने धरून जोराने हिसकावून ओढून जबरीने चोरून घेऊन पळून गेले आहेत.

किराणा दुकानदाराने ही बाब पाहताच चोरट्यांना अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पंरतु, चोरटे गाडी सोडून पळून शेजारील उसाच्या शेतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत दोन चोरट्यांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद उज्वला पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago