मुख्य बातम्या

सरकारी दप्तर थेट गावात! शिरूरमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’चा धडाका

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दि. ०१ मार्च रोजी विदयाधाम प्रशाला, शिरूर येथे पूर्वतयारी बैठक पार पडली.

बैठकीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी भूषविले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी हा उपक्रम राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती व नगर परिषद अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील तसेच विविध लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंडलनिहाय शिबिरांचे वेळापत्रक

मार्च २०२६ :

७ मार्च – पाबळ

१४ मार्च – वडगाव रासाई

२७ मार्च – निमोणे

एप्रिल २०२६ :

१० एप्रिल – तळेगाव ढमढेरे

१७ एप्रिल – मलठण

२४ एप्रिल – टाकळीहाजी

मे २०२६ :

८ मे – न्हावरा

१५ मे – टाकळीहाजी

२० मे – कोरेगाव भिमा

२८ मे – शिरूर

या शिबिरांमध्ये महसूल, कृषी व इतर विभागांच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रलंबित फेरफार व वारस नोंदी निकाली काढणे, जिवंत 7/12 मोहिम, उत्पन्न-रहिवासी-जात दाखले, सामाजिक योजनांसाठी अर्ज, नमुना ६, ७, ८ स्वीकारणे, जमीन भोगवटा वर्ग रूपांतरण, 7/12 दुरुस्ती, घरकुल पट्टे वाटप, ई-मोजणी, पीएम किसान नोंदणी, तक्रार निवारण तसेच कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

या अभियानाद्वारे शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविणे व महसूल विषयक प्रश्न त्वरित निकाली काढणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. शिरूर तालुक्यातील नागरिकांनी आपल्या मंडलातील निश्चित तारखेला आयोजित शिबिरात उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनमहसुल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

5 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

5 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

6 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

21 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago