बीड: बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणारे खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.
क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करताना सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी युवकांचा सहभाग वाढविणे तसेच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य वाव मिळावा, यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा, सरावासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच क्रीडा संकुलातील विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात उपस्थित मुलांशी आस्थेने संवाद साधला. कोणत्या खेळाचा सराव करता, कोणत्या सुविधा आवश्यक आहेत आणि प्रशिक्षण घेताना कोणत्या अडचणी येतात, याबाबत त्यांनी खेळाडूंकडून माहिती घेतली. बीड जिल्ह्यातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळविणारे खेळाडू घडावेत, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…