मुख्य बातम्या

शिरुरमध्ये वादळी पावसाचा तडाखा; एक्सप्रेस फिडरच्या तारा तुटल्याने रांजणगाव MIDC तील पाणी पुरवठा ठप्प

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावाला बुधवार (दि 13) रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड कोसळून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या विज पुरवठा करणाऱ्या तारांवर पडले. यावेळी त्या तारा झाडाखाली उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर कोसळल्या. मात्र सुदैवाने वादळी वाऱ्यामुळे आधीच विजप्रवाह खंडित झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र या घटनेमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा औद्योगिक क्षेत्रालाही फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवार (दि 13) रोजी शिंदोडीसह परिसरात सायंकाळी 6:30 च्या सुमारास विजेच्या प्रचंड कडकडासह वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला. परंतु यावेळी मोठया प्रमाणात सोसाट्याचा वारा असल्यामुळे शिंदोडी येथील एमआयडीसी जॅकवेल रस्त्यावर असणाऱ्या भाऊसाहेब त्रिंबक वाळुंज यांच्या घरासमोर असणारे मोठे झाड वादळी वाऱ्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या विजवाहक तारांवर उन्मळुन पडले.

त्यावेळी या झाडाखाली एक ट्रॅक्टर उभा होता. त्या विजवाहक तारा त्या ट्रॅक्टरवर पडल्या. परंतु सुदैवाने ट्रॅक्टरमध्ये कोणीही नसल्याने अन पाऊसात विद्युत प्रवाह खंडित झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु झाड ट्रकर आणि रस्त्यावरच पडल्यामुळे जवळपास तीन तास रस्ता बंद होता.

त्यानंतर गावातील लाकूड व्यावसायिक अनिल पोपळघट यांनी यांत्रिक मशिनच्या साह्याने ट्रॅक्टरवर पडलेले झाड कापले. यावेळी निलेश वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, योगीराज वाळुंज, गणेश वाळुंज, सागर हाके, अक्षय हाके, प्रशांत फडके, विकास वाळुंज, गणेश भोस या स्थानिक तरुणांनी यावेळी झाडाच्या फांदया बाजुला काढून रस्ता मोकळा केला.

शिरुर; कारभारणीच्या ‘नथी’तुन कारभारीच मारतात तीर; पदाधिकारी महिलेच्या पतींचा वाढतोय हस्तक्षेप…?

शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

8 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago