शिरुर तालुक्यात हॉटेल समोरच तरुणावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) सणसवाडी (ता. शिरुर) परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस ठाण्यात या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रल्हाद देवीलाल मोहिते (वय ३३) रा. माळवाडी, कासारी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिक्रापुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन त्यांच्या तक्रारीवरुन वंश गोऱख दरेकर आणि यश गोऱख दरेकर (रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

सोमवार दि ११ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सणसवाडी गावच्या हद्दीत नगर–पुणे महामार्गावरील शेतकरी वडेवाले समोर आरोपींनी वंश दरेकर आणि यश दरेकर यांनी फिर्यादी प्रल्हाद मोहिते यांना शिवीगाळ करत हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच एवढ्यावरच न थांबता “पुन्हा दिसलास तर आणखीन मारीन” अशी धमकीही दिल्याचे त्यांनी फिर्यादीत नमुद केले आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भरदिवसा महामार्गालगत झालेल्या या मारहाणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार होळकर हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत. 

शिरुर (घोडनदी) न्यायालयाचा धनादेश अनादर प्रकरणी दोषी आरोपीला दणका

शिरुर तालुक्यात भरधाव कंटेनरने पिकअपला चिरडलं; दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

शिरुर तालुक्यातील एम डी ड्रग प्रकरणात मोठ्या माशां’वर कारवाई कधी…?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत