मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात पती आणि पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या असुन पतीने पत्नीला सांभाळण्यासाठी नकार दिल्याने सासरकडच्या मंडळींनी जावयासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. तसेच जावयाने पत्नीसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये पती व पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फिर्यादी शितल भाउसो माने (वय २८) रा.लोखंडे वस्ती, रांजणगाव सांडस ता. शिरूर, जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी भाउसो नाना माने, नाना आप्पा माने, ३) शोभा नाना माने, दिर ४) सचिन नाना माने सर्व रा रा. राजगाव सांडस, (ल वस्ती) ता. शिरूर जि.पुणे यांनी दि १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास रांजणगाव सांडस गावच्या हद्दीतील लोखंडे पेट्रोल पंपाच्या नजीक असलेल्या मनेरमबाबा ओढयाच्या पुलाच्या जवळ फिर्यादी शितल तसेच त्यांचे भाउ वाल्मीक, संदीप, बहीण जाई, मावशी अनुसया हे सर्वजण सासर कडील लोकांना शितल यांना घराबाहेर का काढले आहे…? असे शितल यांचे पती भाउसो यांना विचारपुस करीत असताना त्यांचे पती भाउसो माने यांनी लोखंडी गजाने शितल यांचे भाऊ वाल्मीक यास मारहान करुन दुखापत केली. तसेच शितल यांचे सासरे नाना माने, शोभा माने, सचिन माने सर्व रा. रांजणगाव सांडस यांनी शितल यांच्या सर्व नातेवाईकांना हाताने व लाथा बुक्याने मारहाण, शिवीगाळ दमदाटी केली असल्यामुळे शितल यांनी वरील सर्वांच्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.

 

तसेच भाऊसो नाना माने (वय ३४) रा.लोखंडे वस्ती, रांजणगाव सांडस ता. शिरुर, जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संदिप भागचंद कन्हे, वाल्मीक भांगचंद कन्हे, सुभाबाई भागचंद कन्हे तिघे रा. रामलिंग (कन्हेवाडा) ता. शिरुर, जि.पुणे, शितल भाऊसाहेब माने, रा. राजगाव सांडस, (लोखंडे वस्ती) ता. शिरुर जि.पुणे, जाई संतोष इंगळे, अनुसया नामदेव इंगळे रा. दहिवडी ता. शिरुर जि.पुणे यांनी दि १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास रांजणगाव सांडस गावच्या हद्दीत लोखंडे पेट्रोल पंपानजीक असलेल्या मनेरमबाबा ओढयाच्या पुलाजवळ भाऊसो यांच्या पत्नी शितल यांचे नातेवाईक संदिप कन्हे, वाल्मीक कन्हे, सुभाबाई कन्हे, शितल माने, जाई इंगळे, अनुसया इंगळे हे सर्वजण स्विप्ट कार मध्ये आले.

 

त्यानंतर त्यांनी बेकायदा गर्दी जमाव जमवत भाऊसो हे पत्नी शितल हिस व्यवस्थित सांभळत नाहीत आणि त्यांनी दुसरे लग्न केले आहे या कारणावरुन चिडून जाऊन संदीप कन्हे याने हातामध्ये लोखंडी गज घेऊन भाऊसो यांच्या कपाळावर व पाठीमध्ये मारत दुखापत केली. तर वाल्मीक कन्हे याने भाऊसो यांच्या तोंडावर हाताने फाईट मारत नाकावर जखम केली. तसेच इतर सर्व आरोपीनी भाऊसो यांना तसेच त्यांचे आई-वडील भाऊ यांना मारहाण केली असल्याने भाऊसो माने यांनी वरील सर्वांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.

 

याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली असुन शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी बनकर हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू

ग्राहक पंचायत संस्था शिरूर तालुका अध्यक्षपदी अरुणकुमार मोटे!

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

4 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

20 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

20 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago