शिरूर: ग्राहक पंचायत समिती पुणे जिल्हा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे यांनी संस्थेच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड केली आहे. २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या औचित्याने शिरूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
शिरूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अरुणकुमार मोटे (अध्यक्ष ), साहेबराव लोखंडे (उपाध्यक्ष), उध्दव जाधव (सचिव), शौकत शेख (सहसचिव), गणेश भुजबळ (संघटक), बापूसाहेब शिवले (सहसंघटक), योगेश शेडगे (प्रसिध्दी प्रमुख), आबासाहेब थोरात (कार्यकारी सदस्य), गोपाळराव भुजबळ (कार्यकारी सदस्य), अतुल पाचुंदकर (कार्यकारी सदस्य), वैभव शेलार (कार्यकारी सदस्य)
ग्राहक पंचायत ही ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी झटणारी चळवळ आहे. ग्राहक शोषण मुक्तीचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल करताना कोणत्याही धर्माच्या, व्यक्तीच्या, पक्षाच्या विरुद्ध काम केले जात नाही. शिरूर तालुक्यामध्ये ग्राहकांच्या हक्कासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाशी पत्र व्यवहार केलेले आहेत. समन्वय मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने या संस्थेमार्फत करण्यात आली असून शोषणमुक्त ग्राहक हे ग्राहक पंचायतीचे ध्येय आहे. दुय्यम निबंधक, रेशनिंग, महावितरण, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पाटबंधारे , पंचायत समिती इत्यादी ठिकाणी नागरिकांची कोणत्या ना कोणत्या कारणाने फसवणूक आणि लूट होत असते. ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने शिरूर तालुक्यामध्ये ग्राहक पंचायत चळवळ उभी करणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुणकुमार मोटे यांनी सांगितले.
ग्राहक पंचायत पुणे जिल्हा या संस्थेचे उद्घाटन!