मुख्य बातम्या

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तडीपार असलेल्या गुन्हेगाराने उघडपणे दादागिरी करत “मी इथला भाई आहे” असे म्हणत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मिक्सर वाहन चालकाला अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून घेत गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार गुंडावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक शिरूर संदेश केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष तुकाराम वाखारे (वय ३२, रा. विठ्ठलनगर, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वाखारे यांनी सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मटेरियल टाकण्यासाठी मिक्सर वाहन पाठविले होते.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेला अभिषेक उर्फ घ्या हनुमंत मिसाळ (वय २४, रा. सोनारआळी, शिरूर) घटनास्थळी आला. त्याने मिक्सर वाहन अडवून चालक अमोल भोर याला दमदाटी केली. वाहनाच्या चाव्या काढून घेत “हे काम चालू ठेवायचं असेल तर मला दोन लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर काम बंद होईल आणि हातपाय मोडून गोळ्या घालीन” अशी भीषण धमकी दिली.

इतक्यावर न थांबता आरोपीने चालकाच्या खिशातील ८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. “आजचं काम सुरू ठेवा, उद्यापासून काम करायचं असेल तर दोन लाख रुपये द्या” असे म्हणत आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.

या प्रकारामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तक्रार दाखल होताच शिरूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अभिषेक उर्फ घ्या मिसाळ याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करत आहेत.शिरूर शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

13 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

22 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago