आरोग्य

हळदीचं पाणी की हळदीचं दूध जास्त फायदे कशानं मिळतात

भारतीय घरांमध्ये हळदीचा वापर बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. हळद फक्त अन्नाला रंग देत नाही तर जेवणाची चवही वाढवते. हळदीचे सेवन आरोग्यासाठी बरेच फायदेशीर ठरते. म्हणूनच हेल्थ एक्सपर्ट्स पाण्यात हळद मिसळून ते पाणी पिण्याचा किंवा दूध पिण्याचा सल्ला देतात. हळदीच्या दुधाबरोबरच हळदीचे पाणी प्यायल्यानं ही तब्येतीला बरेच फायदे मिळतात. प्रसिद्ध अमेरीकन डॉक्टर एरिक बर्ग यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरून याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्यांनी हळदीचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगितले आहेत.

हळदीचे पाणी पिण्याचे फायदे

डॉक्टर सांगतात की हळदीत करक्युमिनअसते. जे एक पॉवरफुल एंटी इंफ्लेमेटरी कंम्पाऊंड आहे. करक्युमिन सांध्यांतील वेदना सूज कमी करते. अनेकचा याचा परीणाम इबुप्रोफेन आणि एस्पिरिन यांसारख्या औषधांप्रमाणे असतो पण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत.

हळद ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. खासकरून टाईप २ डायबिटीस असल्यास रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. हे शरीरात मेटाफॉर्मिन सांरख्या औषधांप्रमाणे काम करते. कोणत्याही नुकसानांशिवाय खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. करक्युमिन सेरोटोनिन आणि डोपामाईन यांसारखे हॅप्पी हॉर्मोन्स वाढवतात. ज्यामुळे मूड चांगला राहतो चांगली झोप येते. म्हणून हळदीचं पाणी मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.

हळदीचं पाणी प्यायल्यानं पचनक्रिया मजबूत होते. गॅस, एसिडिटी यांसारख्या समस्या कमी होता. आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात याशिवाय इम्यून सिस्टीम मजबूत होते.

एक ग्लास हलक्या कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर आणि चुटकीभर काळी मिरी मिसळा. तुम्ही चवीसाठी थोडा लिंबू किंवा मध घालू शकता. हळूहळू याचे सेवन करा. काळी मिरी हळदीतील पोषक तत्व योग्य पद्धतीनं शोषण्यास मदत करते.

हळदीचं पाणी कधी प्याव

जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर जेवणाच्या आधी प्या. झोप, इम्यूनिटीशी संबंधित समस्या असतील तर रात्री झोपण्याच्या आधी हे पाणी प्या.

हळदीचं पाणी शरीराला आतून डिटॉक्स करते, सूज कमी करते, मन शांत ठेवते, इम्यूनिटी वाढवते. पण कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

4 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

4 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

4 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

4 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

4 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

4 तास ago