मुख्य बातम्या

पिंपरखेड येथील विद्युतरोहित्र व केबल चोरीप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; प्रफुल्ल बोंबे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घोडनदी काठावरील १०० एच.पी. क्षमतेचे विद्युतरोहित्र निकामी करून २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

घटनास्थळी १० ते १२ जणांच्या टोळीने ही चोरी केल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. ऐन दुष्काळाच्या परिस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून, सिंचन व्यवस्थेवरही त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.

या प्रकरणातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, अन्यथा पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन टाकळी हाजी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य मराठी पत्रकार महासंघ नियोजन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बोंबे यांनी दिला आहे.

बोंबे यांनी सांगितले की, यापूर्वीही या भागात कृषीपंप, केबल चोरी, दरोडे, खून तसेच इतर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्यांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

पिंपरखेड परिसर हा बिबटप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून, मागील दोन-तीन वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच रात्रीचे भारनियमन आणि अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशा वेळी केबल चोरीमुळे त्यांचे आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.

बेट भागात अवैध दारूविक्री, मटका, जुगार यांसारखे अवैध व्यवसायही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करत या प्रकारांवर पोलीस प्रशासनाने प्रभावी कारवाई करावी, अशी मागणीही बोंबे यांनी केली आहे.

विद्युतरोहित्र व केबल चोरीप्रकरणी तातडीने गुन्हेगारांना जेरबंद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

11 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

11 तास ago