मुख्य बातम्या

पुण्यात महसूलच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना CBI च्या अधिकाऱ्यांची दमछाक

पुणे (प्रतिनिधी) पुण्यात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. नुकतेच वाघोली येथे तलाठी कार्यालयातील दोन मदतनीस यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील महसूलचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना 8 लाखांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर अनिल रामोड यांच्या पुण्यातील आणि नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली असुन त्यात सीबीआयचे हाती मोठे घबाड लागले आहे. रामोड यांच्या पुण्यातील तीन घरांमध्ये सुमारे तब्बल 6 कोटी रुपयांची रोकड सीबीआयच्या हाती लागली आहे. ही रक्कम मोजण्यासाठी मशीन आणण्यात आले होते. अनेक तासानंतर हे पैसे मोजून झाले त्यानंतर ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

माळशिरस येथील एका शेतकर्‍याच्या जमिनीचे भू-संपादन झाले होते. त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यासाठी अधिकारी रामोड यांनी त्या शेतकऱ्याकडे 10 लाखांची मागणी होती. पण तडजोडीत 8 लाख रुपये देण्याचे ठरले. पण या शेतकऱ्याने सीबीआयकडे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी लाच घेताना डॉ. रामोड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या पुण्यातील घरातच १४ स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली आहेत. रामोड यांच्या बँक खात्याची तपासणी अद्याप बाकी असुन स्थावर मालमत्ता ही रामोड व त्याच्या कुटुंबियांतील व्यक्तींच्या नावे आहेत.

त्यानंतर हा अधिकारी राहत असलेल्या औंध-बाणेर येथील ऋतुपर्ण सोसायटी येथील बंगला व इतर दोन निवासस्थानाची सीबीआयच्या पथकाने झडती घेतली. त्यात सरकारी निवासस्थानामध्ये पैसे आढळून आले आहे. तीन निवासस्थानी तब्बल सहा कोटी रुपये आढळून आले. या अधिकाऱ्याची नांदेड येथील घराची सीबीआयने झडती घेतली आहे. अनिल रामोड यांना शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असुन या अधिकाऱ्याची आणखी कुठे संपत्ती आहे का…? याचा शोध सीबीआयकडून करण्यात येत आहे. तब्बल 6 कोटींची रक्कम आणि कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

12 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

2 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

2 दिवस ago