मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे नागनाथ सुपर मार्केट समोर गावचे माजी सरपंच यांना जातीवाचक शिवीगाळ करत तु जास्त माजलास का…? आमच्या विरोधात पोलीस चौकीला तक्रार देण्यास निघाला होता काय.. ? तु जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुम्हाला गावात राहु देणार नाही. आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणत आरोपी १) प्रविण भिवा गोरे २) सागर भिवा गोरे ३) चिव्या यल्ला गोरे ४) भिवा अंनता गोरे ५) ताईबाई भिवा गोरे ६) आनंदा गोरे ७) उमाबाई गोरे ८) म्हाळा गोरे सर्व (रा.शिरसगाव काटा) यांनी जातीवाचक शिविगाळ करुन रामचंद्र केशव केदारी तलवार, कोयता, काठीने यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सांयकाळी ५ च्या सुमारास रामचंद्र केदारी हे नेहमीप्रमाणे शेतामध्ये काम करत असताना त्यांना अतुल केदारी याने फोन करुन सांगितले की, आप्पा तुमचे भाऊ (तात्या) यांना गावातील कँनालच्या पुलावरती काही लोकांनी खुप जास्त प्रमाणात मारहाण केली आहे. त्यामुळे ते तात्काळ शेतातुन कँनालच्या पुलावर गेले असता. तो पर्यंत ते मारहान करणारे लोक त्या ठिकाणावरुन निघुन गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावास शिरसगाव काटा येथील दवाखान्यात नेले आणि ते घरी निघून गेले.

 

दि २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी रामचंद्र केदारी यांच्या भावास मारहाण करणारे लोक प्रविण भिवा गोरे, सागर भिवा गोरे,चिव्या चल्ला गोरे व त्याच्यासोबत इतर ५ लोक असल्याचे समजल्याने त्यांच्या विरोधात रामचंद्र केदारी हे पुतन्या निशात केदारी सोबत मांडवगण फराटा येथील पोलीस चौकीस तक्रार नोंदविण्याकरिता निघाले असता त्यांच्या पुतन्याच्या मोबाईलवर गावातील तंटामुक्ती अध्यक्ष सागर भाऊसाहेब गराडे यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की तुम्ही पोलीस केस करु नका झाले प्रकाराबाबत आपण दोन्ही बाजुचे लोक गावात बसून प्रकरण मिटवून घेऊ. त्याबाबत मी तुम्हांला फोन करतो. तेव्हा तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय येथे या, असे सांगितल्याने त्यांनी पोलीस चौकीस न जाता सदरचे प्रकरण मिटवण्याच्या उद्देशाने शेतामध्ये काम करण्याकरिता निघून गेले व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या फोन ची वाट पाहू लागले.

परंतु दुपारपर्यंत फोन न आल्याने पुतन्या निशात याने स्वत:हुन तटामुक्ती अध्यक्ष यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की आज मला काम आहे. समोरची पार्टी ही आलेली नाही. हे प्रकरण आपण नंतर पाहू असे सांगितले. शेतातील काम करून रामचंद्र केदारी हे घरी मोटारसायकल वरुन जात असताना गावातील नागनाथ सुपर मार्केटला आले असता. त्या ठिकाणी सायंकाऴी ६:३० च्या दरम्यान प्रविण भिवा गोरे, सागर भिवा गोरे, चिव्या चला गोरे, यांनी त्यांना अडविले व मोटारसायकलचा हॅन्डल पकडून त्यांना जातीवाचक शिविगाळ करुन तु जास्त माजलास का…? आमच्या विरोधात पोलीस चौकीला तक्रार देण्यास निघाला होता काय…? तु जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुम्हा लोकांना गावात राहुन देणार नाही. आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणून प्रविण भिवा गोरे व चिव्या चल्ला गोरे यांनी तलवार काढून रामचंद्र केदारी याच्या दोन्ही हातावर व पायावर तलवारीने वार केले. तसेच सागर भिवा गोरे याने कोयत्याने पायावर वार केले. त्यामुळे ते खाली पडले.

 

त्यानंतर त्यांनी जोराने आवाज देवून काही लोकांना बोलावले असता भिवा आनंदा गोरे, ताईबाई भिवा गोरे, आनंदा गोरे उमाबाई गोरे, म्हाळा गोरे हे त्या ठिकाणी आले व त्यांना परत काठीने हाताने लाथाबुक्यांनी रामचंद्र केदारी यांना मारहाण करुन याला आज खल्लास करुन टाकु असे म्हणू लागल्याने रामचंद्र केदारी यांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने नागनाथ सुपर मार्केट या दुकानात जावून दुकानाचे मालक नागेश शिवाजी शितोळे व त्याचे वडील यांना वाचवण्याबाबत विनंती केली असता त्यांनी न वाचवता दुकानाचे शटर बंद करुन घेतले. त्यानंतर ते बेशुध्द होवुन खाली पडले. नंतर त्यांना त्यांचा पुतन्या निशात केदारी याने दौंड येथील एका खाजगी दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी नेले आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले हे करत आहेत.

Video: घोडगंगेत प्रकाश रसिकलाल धारिवाल यांची वारस नोंद व्हावी: चंदन सोंडेकर

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago