शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात पन्नास वर्षीय महीलेला चार जणांची लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील एका पन्नास वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरुन तिच्या तोंडावर, गालावर हाताने मारहान केली. या मारहाणी दरम्यान महिला खाली जमिनीवर पडल्यानंतर तिच्या कंबरेवर, पाठीवर, तसेच पोटावर लाथा बुक्यांनी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी १) रामा केशव केदारी २) मन्या ऊर्फ अदित्य रामा केदारी ३) सोन्या बापु केदारी ४) सखाराम बापु केदारी या चार जणांवर शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास फिर्यादी महिला हौसाबाई कोळपे (वय ५०) या गावातील एका टपरीमध्ये माचीस आणण्यासाठी जात असताना कॅनॉलवरील पुलावर त्यांच्या गावातील १) रामा केशव केदारी २) मन्या उर्फ अदित्य रामा केदारी ३) सोन्या बापु केदारी ४) सखाराम बापु केदारी हे सर्वजन उभे होते. त्यावेळी फिर्यादी महिला या पुलावरुन जात असतांना त्यांना रामा केदारी यांनी ‘तुझा भाचा सागर गोरे हा कोठे आहे’ असे विचारले असता. त्या महिलेने त्याना सांगीतले की, मला सागर गोरे कोठे आहे मला माहीत नाही.

 

त्यानंतर त्या टपरीकडे जात असतांना १) रामा केशव केदारी याने त्यांच्या तोंडावर व गालावर हाताने मारहाण केली. त्यावेळी तेथे उभा असलेला २) मन्या उर्फ अदित्य रामा केदारी यांने त्यांना ढकलुन खाली पाडुले. त्यावेळी त्या जोरजोराने आरडा ओरडा करत असताना शेजारी उभे असलेले ३) सोन्या बापु केदारी आणि ४) सखाराम बापु केदारी यांनी त्यांच्या कंबरेवर, पाठीवर, पोटावर लाथा बुक्याने मारहाण केली आणि त्यानंतर ते निघुन गेले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गवळी हे करत आहेत.

शिरुर तालुक्यात जातिवाचक शिवीगाळ करत माजी सरपंचावर आठ जणांचा तलवार व कोयत्याने प्राणघातक हल्ला

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

12 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

1 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago