मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात महसूल आणि पोलिसांचा वसुलीचा चाललाय खेळ; त्यामुळे वाळू माफियांचा बसलाय मेळ

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडेच मार्च एंडची घाई चालु असताना शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस विभागही त्यात मागे नाही. त्यामुळे चिंचणी येथे रात्रंदिवस बेकायदेशीर बेसुमार वाळू उपसा चालु असतानाही महसूलचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी हे जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असुन वाळू माफीयांकडुन त्यांनी ‘लाखों रुपयांची’ वसुली केल्याची सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यात सर्वसामान्य लोकांना कमी दरात वाळू मिळावी यासाठी शासनाच्या वतीने वर्षेभरापुर्वी निमोणे आणि चिंचणी येथे वाळू डेपो चालु करण्यात आले. परंतु हे डेपो चालु झाल्यानंतर किती स्थानिक लोकांना शासनाच्या दराप्रमाणे वाळू मिळाली हा संशोधनाचा विषय आहे. या वाळू डेपोमुळे फक्त ठेकेदार, महसूल आणि पोलिसांना फायदा झाला. सर्वसामान्य लोकांना मात्र फक्त आश्वासनं मिळाली.

कुंपनच जेव्हा शेत खात…
शिरुर तालुक्यात निमोणे आणि चिंचणी येथील वाळू डेपोच्या नावाखाली सध्या रोज सुमारे 70 ते 80 हायवा वाळू चोरुन विकली जात आहे. वाळूचा स्टॉक अपडेट केला जात नसल्यामुळे ऑनलाईन बुकिंग बंद आहे. त्यामुळे वाळू माफिया यांचा मोठया प्रमाणात नंगानाच चालु असुन महसूल आणि पोलिस खात्यातील अधिकारी आमच्यावर काहीच कारवाई करु शकत नाही. कारण आम्ही त्यांना ‘लाखों रुपयांच पॅकेज पोहचवलं आहे असं खाजगीत हे वाळू माफिया सांगत आहेत. त्यामुळे कुंपणचं शेत खातंय’ या म्हणीचा सर्वसामान्य लोकांना प्रत्यय येत आहे.

वाळू माफिया जोमात, महसूल विभाग कोमात…?
सध्या वेगवेगळ्या वृत्तपत्रात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याबाबत सतत बातम्या प्रसिद्ध होत असतानाही महसूल व पोलिस त्यावर काहीच कारवाई का करत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य लोक उपस्थित करत आहेत. तसेच शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणातून नियमबाह्य पद्धतीने बेसुमार वाळू उपसा होत असताना स्थानिक महसूल कर्मचारी कोतवाल, तलाठी, सर्कल हे नेमक काय करतात असा प्रश्न विचारला जात असुन वाळूच्या संदर्भात यापैकी कोणालाही संपर्क साधल्यास फोन उचलला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

मार्च महिन्यात वसुली जोरात…?
सध्या सगळीकडे मार्च एंडिंगची लगबग चालु असुन महसूल आणि कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांकडुन मोठया प्रमाणात वसुली चालु केली असल्याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा चालु आहे. विशेष म्हणजे चिंचणी आणि गुनाट येथील काही शेतकऱ्यांच्या शेतीचे वाळू माफियांनी नुकसान केले असल्यामुळे गुनाट येथील सामाजिक कार्यकर्ते भिवसेन कोळपे यांनी शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना शेतीचे नुकसान केल्याबाबत तक्रार अर्ज केला होता. परंतु त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. याबाबत तहसीलदारांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

(क्रमश:)

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट

व्हिडीओ:- घोड धरणात रात्रीस वाळू उपशाचा चालतोय खेळ, प्रशासन सुस्त आणि वाळू चोर मस्त…

वाळू ठेकेदाराचा नवीन प्रताप, स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे बुकिंग करत अनधिकृत वाळूविक्री

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

काळा पैसा कमवायचा वाळू माफियांनी घातलाय घाट, पण त्यामुळे रस्त्याची मात्र लागतीये वाट

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago