वाळू ठेकेदाराचा नवीन प्रताप, स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे बुकिंग करत अनधिकृत वाळूविक्री

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील पिंपळाचीवाडी वाळू डेपोमध्ये सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नाही. परंतु वाळू ठेकेदार याने स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने बुकिंग करुन अनधिकृतरीत्या लाखो ब्रास वाळू विक्री केल्याची तक्रार करत याबाबतचे निवेदन निमोणे ग्रामस्थांनी शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के तसेच प्रांत हरीश सूळ यांना दिले असुन वाळू ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.

शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना कमी दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी घोड धरणातील निमोणे तसेच चिंचणी येथे वाळूचा लिलाव करत वाळूडेपो उभारण्यात आले. परंतु वाळूचा लिलाव झाल्यानंतर आठ महिन्यात सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू डेपो धारक सुयश धनसिंग भोईटे याने त्याचे दाजी आणि नातेवाईक असलेल्या संदीप संभाजी फराटे यांच्या नावे ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करत अनधिकृतपणे वाळूची विक्री केली आहे.

याबाबत निमोणे ग्रामस्थांनी शिरुरचे प्रांत आणि तहसीलदार यांना याबाबत निवेदन दिले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनातील काही ठळक मुद्दे

 

१) आमच्या गावामध्ये आपण वाळू डेपो मंजूर केलेला आहे. परंतु वाळू डेपो धारक सुयश धनसिंग भोईटे त्याचे नातेवाईक दाजी संदीप संभाजी फराटे यांच्या नावे ओनलाईन पद्धतीने स्वतः डेपो धारक ऑनलाईन पावती बुकिंग करत आहे

 

२) आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ज्या गाड्या वाळू डेपो मधून भरून जात होत्या त्या गाड्यांच्या आम्ही शासकीय परवाना (पावत्या) तपासल्या असता. त्यामध्ये आम्हाला असे निदर्शनास आले की सर्व गाड्या वाळू डेपो धारक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकच्या आहेत. तसेच वाहन शासकीय परवाना वाळू कोणाच्या नावाने आहे याची तपासणी केली असता ती वाळू परवाना (पावती) संदीप संभाजी फराटे हे वाळू खरेदीदार आहेत ते डेपो धारक यांचे सख्खे दाजी आहेत.

 

३) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात कानगाव येथील वाळू डेपोधारक सुयश धनसिंग भोईटे व संदीप फराटे यांनी अनधिकृतपणे वाळूची चोरी केली म्हणून त्यांच्याविरुद्ध दौंड तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालय पथकाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हे दोघे संगनमताने वाळू चोरी करतात हे निदर्शनास आले आहे.

 

4) निमोणे येथे वाळू डेपोमध्ये वाळू वाहतुक होत असुन सदर वाळु वाहतुकीकरीता वापरण्यात येणारी १२ व १४ टायर गाडीची वाहने ही आरटीओ पेपर थकीत आहेत. तसेच पिंपळाच्यावाडीत जाण्या-येण्याकरीता एकच रस्ता आहे. त्यामुळे दळणवळणाकरीता मोठ्या अडचणी येतात व मोठ्या वाहनांच्या म्हणजेच १२ व १४ टायर गाडीच्या वाहन वाहतुकीमुळे रस्ता पुर्णपणे खराब झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातुन शेतमाल काढणे व ऊस वाहतुक पुर्णपणे बंद झाली आहे.

 

5) नदीपात्रातुन वाळू डेपोपर्यंत सहाचाकी वाहनाने वाळू आणण्याचा शासनाचा GR आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करुन १०-१२ टायर वाहनाने डेपोमध्ये वाळू आणली जाते. तरी सदर आरटीओ पेपर थकीत वाहनांची योग्य ती चौकशी करुन तात्काळ सदरचे वाहने वाहतुक बंद करण्यात यावी.

 

6) वाळू डेपो धारक सुयश भोईटे आणि ऑनलाइन बुकिंग करणारा धारक संदीप फराटे हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असुन अशा पद्धतीने संगनमताने शासनाला लुटण्याचे काम चालू आहे. आमच्या जवळच्या गावच्या लोकांना रितसर वाळू मिळत नाही. परंतु डेपो धारकाचे वाळूचोर नातेवाईक व दाजीला वाळू मिळते. त्यामुळे जर शासन वाळूडेपो अशा पद्धतीने चालविणार असेल तर आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने डेपो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

7) शासनाची योजना अतिशय चांगली आहे परंतु डेपो धारक शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे कोणत्याही प्रकारे पालन नाही योजना फसलेली आहे. वाळूच्या ठेक्याच्या आदेशामध्ये नदी ते डेपो फक्त ट्रैक्टर व 6 टिप्पर वाळू वाहतूक करणे बंधनकारक राहील असेनमुद असताना वाळू डेपो धारकाने 10 टायर गाडीचा वाळू वाहन्यासाठी वापर केला जात आहे.

 

8) अवैध वाळू वाहतुकीतून शाळेची संरक्षण भिंत व मुलांचे शौचालय पूर्णपणे पडले असुन मुलांना शौचालयासाठी रस्ता ओलांडून जावे लागत असल्याने मुलांची सुरक्षेची बाब गंभीर झाली आहे.

 

9) वाळू डेपो धारकाच्या विरुद्ध पंचनामा झाला असताना वाळूडेपो धारक वाळू डेपो कस काय चालू आहे याचा प्रश्न समस्त ग्रामस्थ यांना पडलेला आहे. हा डेपो सर्वसामान्यांसाठी नसून केवळ डेपोधारंकासाठी असुन आपण यावर लवकरात लवकर कारवाई करून यांचा अवैध डेपो रद्द करावा.

 

10) आपल्याकडील आदेशामध्ये नदी ते डेपो फक्त ट्रॅक्टर व 6 टिप्पर वाळू वाहतू करणे बंधनकारक राहील. परंतु वाळू डेपो धारकाने 10 टायर गाडीचा नदीपात्रापासून ते डेपो पर्यंतचे वाहतुकीसाठी वापर केलेला आहे. आपण घालून दिलेल्या अटी व शर्तीचे त्याने पालन केलेले नाही. तसा पंचनामा नायब तहसीलदार स्नेहा गोसावी तसेच तलाठी सर्कल यांनी तयार करून तहसीलदार यांच्याकडे पाठवला आहे.

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात

शिरुर तालुक्यात गावठी कट्टे आणण्यासाठी वाळू माफिया वापरत असलेल्या गाडीचा वापर..? नागरिकांमध्ये कुजबुज

काळा पैसा कमवायचा वाळू माफियांनी घातलाय घाट, पण त्यामुळे रस्त्याची मात्र लागतीये वाट

घोड धरणातून चोरुन वाळू वाहतुक करणाऱ्या गाड्यांवर तहसीलदारांची कारवाई

शिरुर तालुक्यातील वाळू लिलावाच्या धोरणामध्ये बदल करण्याची शिवसेनेची मागणी

शिरुर तालुक्यात वाळूच्या पैशाच्या वादातुन दोन ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी