मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात त्या उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्याला दणका

जिल्हाधिकाऱ्यां नंतर विभागीय आयुक्तांनी दोघांना ठरवले अपात्र

शिक्रापूर (शेरखान शेख): खैरेवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर मांदळे या दोघांना यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी नुकतेच विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत दोघांना देखील अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

खैरेवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे या दोघांनी शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केले असून त्याबाबतची माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करताना खोट्या पद्धतीने सादर केल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वैभव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे यांनी दोघांची पदे अपात्र ठरवले होते.

त्यानंतर दोघांनी देखील विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी देखील त्यावर निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवत उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे व ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे या दोघांचे देखील पद अपात्र ठरवले आहे, तर विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे दोघांना चांगलाच दणका बसला असून शिरुर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

2 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago