Shirur Police Station
शिरुर (अरुणकुमार मोटे) रावडेवाडी ता. शिरूर येथील लक्ष्मण तांबे याला त्याचाच मुलगा ओंकार उर्फ लक्ष लक्ष्मण तांबे ( वय१६ वर्ष ) याने जमिनीच्या वादातून पाठलाग करून रस्त्यामध्ये अडवून कोयत्या सारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की लक्ष्मण तांबे यांना दोन पत्नी असुन ते दुसऱ्या पत्नीसोबत भोसरी येथे राहतात. त्यांचा मुलगा ओंकार उर्फ लक्ष हा पहिल्या पत्नीचा मुलगा असून त्यांच्यात जमीनीच्या वाटपावरून वाद होता. त्या संदर्भात (दि ७) रोजी दुपारी चार वाजता कोर्टाची तारीख उरकुन वडिल लक्ष्मण तांबे हे मलठण येथे जात असताना त्यांना नानीचा मळा येथे रस्त्यावर अडवून त्यांचा मुलगा ओंकार उर्फ लक्ष लक्ष्मण तांबे याने कोयत्याच्या सहाय्याने जोरदार हल्ला चढवला.
या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील ऊपचारासाठी के ईएम हॉस्पीटल पुणे येथे पाठवण्यात आले आहे. घटना कळताच घटनास्थळी टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले, सहाय्यक फौजदार माणिक मांडगे, कॉन्स्टेबल विशाल पालवे यांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.
सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…
वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवलिंग, शंख आणि गंगाजल घरात ठेवल्याने धार्मिक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मकता…
मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील…
मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी…
काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; "अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही" मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान…
गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने…