मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलिसांची आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ…?

शिरुर (तेजस फडके): एका पोटगीच्या दाव्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये पोटगी थकल्याने शिरुर न्यायालयाने पतीला अटक वारंट काढत रांजणगाव MIDC पोलिसांना त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. याबाबत ‘त्या’ पीडितेने पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांची भेट घेतली होती. परंतु त्या आरोपीला अटक करुन कोर्टात हजर करण्याऐवजी सहायक फौजदार गुलाब येळे यांनी त्याला अटक करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप “या’ पिडितेने केला आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांचे वेगवेगळे कारनामे सध्या समोर येत असुन पोलिस ठाण्यात तक्रारदाराला न्याय मिळण्याऐवजी त्यांच्यावरच अन्याय होत आहे. रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील पीडितेने शिरुर कोर्टात पोटगीचा दावा लावला असुन यापूर्वीही शिरुर न्यायालयाने तिच्या पतीला अटक करण्यासाठी अटक वारंट काढले होते. त्यावेळी सहायक फौजदार गुलाब येळे यांनी सदर आरोपीस अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पोटगी न भरल्याने न्यायालयाने त्या आरोपीची रवानगी थेट येरवडा कारागृहात केली होती.

यावेळी शिरुर ते येरवडा या प्रवासा दरम्यान आरोपीशी गुलाब येळे यांची ओळख झाली. त्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. त्यानंतर सदर आरोपीने पोटगीचे पैसे न भरल्याने कोर्टाने परत ‘त्या’ आरोपी विरोधात अटक वारंट काढले. यावेळी पीडितेने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांची समक्ष भेट घेत पोटगी थकल्याने अटक वारंट बजावून “त्या” आरोपीस अटक करुन कोर्टात हजर करण्याची विनंती केली. यावेळी बलवंत मांडगे यांनी सहायक फौजदार गुलाब येळे यांना त्या आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर “या” पिडितेने वारंवार गुलाब येळे यांना फोन करुन आरोपीस अटक केली का नाही याबाबत विचारणा केली. मात्र गुलाब येळे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आरोपीस अटक करण्याचे टाळले.

त्यानंतर सदर पिडितेने पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांना वारंवार फोन करुन आरोपीस अटक करण्याची विनंती केली. त्यांनीही आरोपीस अटक करतो असे सांगितले. परंतु आरोपीस अटक करण्याऐवजी रांजणगाव MIDC चे सहायक फौजदार गुलाब येळे यांनी न्यायालयाचा आदेश असतानाही मोठया प्रमाणात आर्थिक तडजोड करत आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप “त्या” पीडितेने केला असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे आणि सहायक फौजदार गुलाब येळे यांच्या विरोधात उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना संगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

10 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

18 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

19 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

20 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago