मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील त्या ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची चौकशी करा…

सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाल्याचे माहिती अधिकारात उघड झालेले असून सदर गैरकारभाराची चौकशी करत ग्रामविकास अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी अहवाल येई पर्यंत प्रशासकाची नेमणूक करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सहाशे पानांचे पुरावे व निवेदन देत केली आहे.

करंदी (ता. शिरुर) ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी शासकीय कार्यालयातील कामाव्यतिरिक्त बाहेरगावी जाणे त्याबाबत भत्ता देणे, ग्रामपंचायत लेटर पॅड बिलांमध्ये मोठी तफावत, नळ पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीमध्ये लाखोंचा खर्च, गावामध्ये अधिकृत स्ट्रीट लाईट पेक्षा लाईटच्या संख्येपेक्षा दुपटीने बल्प बदलण्याचा खर्च, गावामध्ये झाडे लावण्यासह मुरुमीकरण करण्यासाठी लाखोंचा खर्च, अद्याप पर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने सुट्टी न घेतल्याचे त्यांच्या पगारातील बिलातून दिसत आहे.

गावामध्ये गावच्या सुरक्षिततेच्या हेतूने आवश्यक ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामपंचायत खात्यात पैसे असताना देखील सुरु केलेली नाही, ग्रामपंचायत ने दिलेल्या काही दाखले तसेच नोटीस वर जावक क्रमांक नाही. ग्रामस्थांना काही नोटीस साध्या कागदावर बजावण्यात आलेल्या असून काही दाखल्यांवर ग्रामविकास अधिकारी तर काही दाखल्यांवर सरपंच यांची सही देखील नाही. त्यामुळे विना नोंद काही दाखले ग्रामपंचायत कडून गेल्याचे उघड होत आहे.

यापूर्वी काही ग्रामस्थांनी अतिक्रमण बाबत तक्रारी करुन देखील ग्रामपंचायत प्रशासनाने स्वतःच्या स्वार्थासाठी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, यांसह आर्थिक व्यवहाराच्या घटना मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत मध्ये घडलेल्या असून जनतेच्या पैशाचा मोठा भ्रष्टाचार होत असल्याने सदर ग्रामपंचायतच्या कारभाराची व सदर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करुन सदर चौकशी पूर्ण होईपर्यंत ग्रामविकास अधिकारी यांना सत्तेचा रजेवर पाठवावे आणि ग्रामपंचायत दप्तराची तसेच कारभाराची चौकशी करुन चौकशी अहवाल येईपर्यंत ग्रामपंचायतवर प्रशासकाची नेमणूक करुन दोषींवर कायदेशीर व कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना तब्बल 600 पानांचे पुरावे आणि लेखी निवेदन देत केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

9 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago