मुख्य बातम्या

शिरुरमध्ये सोने मोजन्याच्या वजन काट्याचा वापर आता एमडी ड्रग्ज मोजण्यासाठी…?

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्ह्यासह राज्यभरात थैमान घालणाऱ्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) या घातक अंमली पदार्थाचे सावट आता थेट शिरूर शहर आणि तालुक्यावर गडद होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. ज्या डिजिटल पॉकेट वजन काट्यांचा वापर सामान्यतः सोने-चांदी, मौल्यवान दागिने किंवा रत्नांचे अचूक वजन मोजण्यासाठी केला जातो, तेच काटे आता ड्रग्ज मोजण्यासाठी वापरले जात असल्याची चर्चा शिरुरमध्ये दबक्या आवाजात सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे, शहरातील एका छोट्या इलेक्ट्रॉनिक दुकानातुन अवघ्या काही दिवसांत तब्बल ५० ते ६० डिजिटल वजन काट्यांची विक्री झाल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून शिरुर शहरातील काही इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये २० ते २५ वयोगटातील तरुणांची वर्दळ अचानक वाढली आहे. हे तरुण विशेषतः ‘डिजिटल पॉकेट स्केल’ची मागणी करत असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला हि नियमित विक्री असल्याचे दुकानदारांना वाटले. मात्र अल्पवयीन तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर एकाच प्रकारचे वजन काटे खरेदी होऊ लागल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनाही संशय येऊ लागला आहे.

“सोन्याचे वजन मोजण्यासाठी वापरले जाणारे काटे एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांकडे का जात आहेत?” हा प्रश्न आता शिरुरकरांच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

ग्रॅम नव्हे…मिलीग्रॅममध्ये चालतो ‘मौत का कारोबार’…

‘एमडी ड्रग्ज’ ची विक्री हि अत्यंत सूक्ष्म प्रमाणात ग्रॅम आणि मिलीग्रॅममध्ये केली जाते. या अंमली पदार्थाची किंमत लाखोंमध्ये असल्याने त्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी डिजिटल पॉकेट स्केलचा वापर केला जातो. त्यामुळे शिरुरमध्ये अशा काट्यांची अचानक वाढलेली विक्री ही केवळ योगायोग नसून, त्यामागे ड्रग्जच्या वाढत्या अवैध व्यवहाराचे मोठे जाळे सक्रिय असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

शिरुर तालुक्यात युवक झालेत व्यसनाधीन…

सुत्रांच्या माहितीनुसार, पुणे शहरातून ग्रामीण भागात एमडी ड्रग्जचे जाळे झपाट्याने पसरत असून शिरुर तालुक्यातील काही भाग ‘सेफ झोन’ म्हणून वापरले जात असल्याचीही चर्चा आहे. गावोगावी बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या धंद्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

शिरुरमध्ये नेमके कोण चालवते हे रॅकेट…?

शिरुर शहरात आणि तालुक्यात अचानक वाढलेली संशयास्पद हालचाल पाहता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर वजन काटे खरेदी करणारे तरुण नेमके कोण…?

त्यांच्या मागे कोणते ड्रग्ज पुरवठादार सक्रिय आहेत…? शहरात एमडी ड्रग्जचा साठा नक्की कुठून येतो…? स्थानिक पातळीवर कोणत्या टोळ्या हे जाळे चालवत आहेत…? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व हालचालींकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष तर होत नाही ना…? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

पालकांनो वेळीच सावध व्हा; अन्यथा…

तज्ज्ञांच्या मते, ड्रग्जच्या आहारी गेलेली तरुण पिढी सुरुवातीला मित्रांच्या दबावाखाली किंवा “फॅशन” म्हणून या पदार्थांकडे वळते. त्यानंतर हळूहळू व्यसन, गुन्हेगारी आणि मानसिक अधःपतनाचा प्रवास सुरु होतो. त्यामुळे जर आपल्या घरातील मुलांकडे किंवा परिसरातील तरुणांकडे संशयास्पद डिजिटल वजन काटे, लहान प्लास्टिक पॅकेट्स, पांढऱ्या पावडरीचे अंश किंवा अचानक वाढलेला खर्च दिसत असेल, तर पालकांनी वेळीच सतर्क होण्याची गरज आहे.

पोलीस प्रशासनाने आता मोठी मोहीम हाती घेण्याची गरज…?

शिरुरमध्ये वाढत चाललेल्या ड्रग्जच्या सावटामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. केवळ एखाद्या छोट्या दुकानातून ५०-६० डिजिटल वजन काट्यांची विक्री होणे हि साधी घटना नाही. या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक, तांत्रिक आणि गुन्हेगारी अंगाने चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. ‘एम डी ड्रग्ज’ चा हा विळखा वेळीच तोडला नाही, तर उद्या शिरुर तालुक्यातील तरुण पिढी व्यसनाच्या अंधारात कायमची हरवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “एमडी”च्या या वाढत्या सावटामागील मोठे मासे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, ही आता काळाची गरज बनली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

6 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

6 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

10 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

10 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

10 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

10 तास ago