मुख्य बातम्या

रामलिंग येथे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार): कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन यांच्या वतीने रामलिंग येथील मंगलकार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, अ‍ॅड भाग्यश्री बोरा, रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, सरपंच लता कर्डिले, सुनिता जगताप, स्वाती थोरात, गायत्री डींगरे, कमल कुरुंदळे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गाव पातळीवर सहकार्य करणाऱ्या महिलांना ज्योती दळवी, ज्योती गोसावी, छाया ढवळे यांनाही सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत तसेच दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी ॲड भाग्यश्री बोरा यांनी महिलांना कायदे आणि त्यांचा वापर याविषयी माहिती सांगितली.

यावेळी घेण्यात आलेल्या नृत्यस्पर्धेत गीता आढाव, दिव्या दळवी, अश्विनी जाधव, पुजा पवार यांनी सादरीकरण केले. तर गायन स्पर्धेत अर्चना कर्डिले, मीरा घोडके, सपना कर्डिले यांनी तसेच रांगोळी स्पर्धेत राणी बनकर,पुजा देशमाने, रोहिणी जामदार यांनी सहभाग घेतल्याने वरील सर्व महिलांना सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी डॉ वैशाली साखरे, ग्रामपंचायत सदस्य लता इसवे या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्व महिलांना सॅनिटरी पॅड वाटण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल राठोड, रुपाली बोर्डे, राधा घेगडे, प्रज्वल थोपटे, उज्ज्वला ईचके,लीलाधर रोठे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अमोल राठोड यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago