मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात साखरेची चक्क ३९२ पोती चोरीला गेली…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी अनेकवेळा चोऱ्या तसेच इतर प्रकार घडत असतात. परंतु रांजणगाव MIDC मध्ये असलेल्या एका गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क ३९२ साखरेची पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

 

याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon MIDC Police) दिलेल्या माहितीनुसार दि १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १०:३० ते दि ११ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) मधील पिव्हीसन्स कंपनी (PV Sons) जवळील अग्रवाल यांचे साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाचे गोडावुन (ता. शिरुर,जि. पुणे) येथे नॅशनल बल्क हँडलींग कापोरेषन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ताब्यात आसणाऱ्या गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुच्या भिंतीवर पडली. त्यामुळे ती भिंत कोसळून पोती बाहेर रोडवर गेली.

 

त्यामुळे रोडने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोंकानी त्या ठिकाणावरुन ५० किलो वजनाची एकुन ३९२ साखरेची पोती (प्रति किलो ३७. ५० रुपये ) किमतीचा एकुण ७ लाख ३५ हजार रुपयाचा माल रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या अज्ञात लोकांनी चोरुन नेला असल्याची फिर्याद अक्षय कोंडीराम कटके (वय २४) रा. इंदीरा चौंक, निलंगा, ता. निलंगा जि. लातुर यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला दिली आहे.

 

रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

रांजणगाव MIDC पोलिसांनी उसतोड मजुर पत्नीचा खुन करुर फरार झालेल्या आरोपीस केली अटक

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

रांजणगाव MIDC त लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी माजी सरपंचासह चार जणांची कंपनीच्या HR ला मारहाण

शिरुर; पनीर बनविण्याच्या कारखान्यात भागीदारी देतो म्हणुन महिलेसह तिच्या मैत्रिणीला करोडोंचा गंडा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

3 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

7 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

7 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

7 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

8 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

9 तास ago