मुख्य बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मुंबई : राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तक्ता प्रसिद्ध केला असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचे विभाजन स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील एकूण ३२ जिल्हा परिषद आणि ३३४ पंचायत समित्यांमधील जागांसाठी ही सोडत काढली जाणार आहे. आरक्षण सोडतीनंतर जिल्हाधिकारी प्राथमिक आरक्षण जाहीर करतील. त्यावर हरकती व सूचना घेण्यात येतील. त्यानंतर विभागीय आयुक्त अंतिम अहवाल शासनाकडे सादर करतील. ३ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणाचा तिढा सुटणार आहे.

दरम्यान, आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीकृत पद्धतीने चिठ्ठ्या टाकून जागांचे वाटप करण्यात आले. यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आरक्षण निश्चित झाले असल्याची माहिती आयोगाने दिली आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची गणिते बदलणार असून अनेक ठिकाणी तिकीट वाटपात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत याबाबतची राजकीय घडामोडी वेगाने घडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल.

राहुल गांधी प्रचंड आक्रमक होताच निवडणूक आयोगाची नवी खेळी

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार देशातील 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

निवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला! नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद अन् महापालिका निवडणूक एकत्र

निवडणूक आयोग मोदी सरकारच्या हातचे बाहुले, मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून ४८ तासात नियम ९३ बदलला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago