मुख्य बातम्या

रांजणगाव एमआयडीसीत अंमली पदार्थांवर मोठा छापा; ६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी परिसरात अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी व धडक कारवाई करत तब्बल ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्यात सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अवैध अंमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून सतत कारवाई सुरू आहे.

दि. १६ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रांजणगाव एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार, प्रशांत फक्कड मावळे रा (वय २४, रा. गणेगाव रोड संकल्प सिटी रांजणगाव गणपती , ता. शिरूर, जि. पुणे) हा आरोपी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत आरोपी प्रशांत मावळे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून ३४ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा तसेच इतर साहित्य असा एकूण ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २१(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्राथमिक चौकशीत आरोपी प्रशांत मावळे याने सदर अंमली पदार्थ हा विकास दातीर (रा. माळीवाडी, सोनगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच त्यांच्या पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली.अंमली पदार्थांच्या विरोधात अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago