शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये फिर्यादींना मारहाण करुन दुखापत केल्याच्या तक्रारी शिरुर पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. एका घटनेत फिर्यादीच्या पत्नीला धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

जागेच्या वादातून मारहाण; सहा जणांवर आरोप 

पहिल्या घटनेत टाकळी हाजी येथील साबळेवाडी, बापुसाहेब नगर परिसरात जागेच्या वादातून विलास गिरीधर चव्हाण यांना मारहाण करुन दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या पत्नीला धमकी दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणात विक्रम राघु चव्हाण, अशोक पोपट चव्हाण, दत्तात्रय परशुराम चव्हाण, भिवाजी पांडुरंग चव्हाण, फुलाबाई राषु चव्हाण आणि मंगल परशुराम चव्हाण (सर्व रा. साबळेवाडी, बापुसाहेब नगर, टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार वायाळ करीत आहेत.

शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या वादातून कुटुंबीयांना मारहाण…

दुसऱ्या घटनेत शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणात फिर्यादी पिंटू आप्पा करगळ, त्यांचे भाऊ आणि बहीण यांना मारहाण करुन दुखापत केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणात बानुबाई दौलत करगळ आणि बापू दौलत करगळ (दोघे रा. फाकटे, ता. शिरुर, जि. पुणे), तसेच संतोष महादू कोळपे, दत्ता कोळपे (पूर्ण नाव माहीत नाही) आणि संतोष महादू कोळपे याचा एक मित्र (नाव माहीत नाही), सर्व रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे, यांच्यावरही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत