मुख्य बातम्या

शिरुर मध्ये सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्यासह कार्यकर्त्यांचे सामुहिक मुंडण

शिरुर (तेजस फडके) राज्य महामार्ग क्रमांक १०३ वरील आमदाबाद ते मलठण रस्त्यावरील व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ट कामांबाबत निषेध व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज यांनी सुरु केलेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनाला आज रविवार (दि ८) रोजी आठ दिवस पूर्ण झाले. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ वाळूंज व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरुर तहसिल कार्यालयाच्या आवारात आज (दि ८) रोजी सामुहिक मुंडण करत शासनाचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच आमरण उपोषणाची घोषणा केली.

या सामुहिक मुंडण आंदोलनात निलेश वाळूंज, सागर रासकर, दादाभाऊ कुरुंदळे, कल्पना पुंडे, मान्यता वाळूंज यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी सुनिता वाखारे, सोनाली दसगुडे, भाऊसाहेब लाळगे, गौतम कुदळे, शेखर कुरुंदळे, बबलू कुरुंदळे, प्रताप दसगुडे, ज्ञानदेव माऊली कुरुंदळे, सोमनाथ देव्हाडे, अर्णव कुरुंदळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य महामार्ग क्रमांक १०३ वरील आमदाबाद ते मलठण रस्त्यावरील व कोंढाण ओढा पुलावरील निकृष्ट कामांबाबत रस्ता कामातील अनियमिततेच्या निषेधार्थ वाळूंज यांचे आंदोलन सुरु असुन शासनाचा तीव्र शब्दात निषेध करत सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज म्हणाले, “या आंदोलना संदर्भात राष्ट्रपती कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून, शासन व अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली तरीही कोणत्याच कार्यालयाकडुन या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही.” त्यामुळे उद्या सोमवार (दि ९) जूनपासून आमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.

निलेश वाळूंज यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे 

१) राज्य महामार्ग १०३ वरील रस्त्याचे निकृष्ट काम त्वरित बंद करून दर्जेदार पद्धतीने नव्याने सुरू करावे.

२) दक्षता गुणनियंत्रण मंडळामार्फत सखोल तांत्रिक तपासणी करुन चौकशी अहवाल जनतेसमोर जाहीर करावा.

३) रामलिंग ते अन्नापुर रस्त्यावर झालेल्या पुर्वीच्या निकृष्ट कामाचा तपास अहवालही जनतेपुढे सादर करावा.

४) संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर शासन निर्णय २०१७ नुसार गुन्हे दाखल करावेत.

५) आंदोलनाच्या आदल्या दिवशी अचानक सुरू करण्यात आलेल्या कामाचीही चौकशी करावी.

सदर आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असुन निलेश वाळुंज यांनी जाहीर केलेल्या आमरण उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित ठेकेदारांवर त्वरित कारवाई करुन नागरिकांच्या सुरक्षेचा आणि अधिकारांचा विचार करावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

रांजणगाव तिहेरी हत्याकांड; लव्ह, सेक्स आणि धोका…?

शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago