आरोग्य

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा या चुका

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते. पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात. त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात. त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात. अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला लागते. मुलांना जेऊ घालताना नक्की कोणत्या गोष्टी टाळाव्या. मुल जेवताना नखरे करत असतील तर, कशा पद्धतीने त्यांना हाताळायच.

मुलांना खायला घालताना कोणत्या चुका टाळाव्या

मुलाला जबरदस्तीने खाऊ घालणे

आपण ज्यापद्धतीने ३ वेळचं अन्न खातो, त्याचपद्धतीने मुल ३ वेळ जेवण करेल असं नाही. ते काही वेळेस कमी, तर काही वेळेस जास्त प्रमाणात खातात. काही दिवस ते सर्व प्रकारचे पदार्थ खातात. तर काही दिवस एक वेळच जेवतात. त्यामुळे जेवताना त्यांना कधीही जबरदस्ती करू नका. त्यांच्या आवडीनुसार पौष्टीक पदार्थ खायला द्या. शिवाय अन्नाचे महत्व पटवून द्या.

विविध पदार्थ खायला द्या

मुलासाठी पदार्थ तयार करताना, आकर्षक पदार्थ तयार करा. जेणेकरून मुलांना याची सवय होईल. फक्त पालकची भाजी न देता, आपण त्यांना पालक पुरी, पालक राईस किंवा पालक डाळ पदार्थ तयार करून देऊ शकता. जेणेकरून ते आवडीने खातील.

स्नॅक्स देणे टाळा

मुलं जेव्हा काहीही खाण्यास नकार देतात, तेव्हा पालक त्यांना स्नॅक्स देतात. जे अत्यंत चुकीचे आहे. आपण मुलांना स्नॅक्स ऐवजी घरगुती पदार्थ खायला देऊ शकतात. पौष्टीक पदार्थांचेही स्नॅक्स आपण त्यांना खायला देऊ शकता. असे केल्याने मुलांची स्नॅक्स खणायची सवय सुटेल.

मुलांसोबत न खाणे

अनेकदा मुलांना एकटे जेऊ वाटत नाही. आई – वडिलांसोबत जेवल्याने त्यांना अर्थात ते २ घास एक्स्ट्रा खाऊ शकतात. पालकांसोबत जेवल्याने मुल आवडीने जेवणाचं ताट संपवेल यात काही शंका नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

2 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

23 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago