शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथे उद्या (दि 16) रोजी पवार कुटुंबियांच्या वतीने सुखकर्ता लॉन्स येथे मातृ-पितृ कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन त्यानिमित्त समाजप्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचे दुपारी 11 ते 1 च्या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
रांजणगाव गणपती येथील प्रसिद्ध गाडामालक पवार कुटुंबातील बबनराव धोंडिबा पवार आणि झुंबराबाई बबनराव पवार, तुकाराम धोंडिबा पवार व नंदाबाई तुकाराम पवार, तसेच विठ्ठल धोंडिबा पवार व मंगल विठ्ठल पवार या तीन जोडप्यांचा त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कृतज्ञता व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच कुटुंबातील कन्या पुजा विठ्ठल पवार-सासवडे यांची नुकतीच DYSP पदी नियुक्ती झाली असुन यांचाही सत्कार पवार कुटुंबीयांच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिरुर,आंबेगाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती उद्योजक शरद पवार यांनी दिली.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…