मुख्य बातम्या

शिरूरमधील सराईत गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई; पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात सराफा दुकानावर फायरिंग करून तसेच गावठी पिस्तूल बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या शरद बन्सी मल्लाव (वय २५, रा. काची आळी, शिरूर) या सराईत गुन्हेगाराविरोधात MPDA (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चालू वर्षातील पुणे ग्रामीण विभागातील पहिलीच धडक कार्यवाही ठरली आहे.

शरद मल्लाव हा शिरूर पोलीस ठाण्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डवरील सक्रिय गुंड असून त्याच्याविरुद्ध शिरूर, रांजणगाव, तसेच पाली (जि. रायगड) पोलीस ठाण्यांमध्ये २०२१ ते २०२४ या कालावधीत एकूण ७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न, प्राणघातक हल्ले, मालमत्तेचे नुकसान, शिवीगाळ आणि दमदाटी अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे समाविष्ट आहेत.

या गुन्हेगारास यापूर्वी दोन वेळा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र तरीही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. हद्दपारीच्या कालावधीत देखील त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली होती. परिणामी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या शिफारशीवरून आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार त्याच्यावर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

(दि. ९) एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शरद मल्लाव याला काची आळी, शिरूर येथून ताब्यात घेण्यात आले आणि त्यास मध्यवर्ती कारागृह, अकोला येथे रवाना करण्यात आले आहे.या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक संदेश केंजळे ,पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक फौजदार महेश बनकर, पोलीस हवालदार मंगेश थिगळे, परशराम सांगळे, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ यांचा मोलाचा सहभाग होता.

शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने २०२४ व २०२५ या कालावधीत आतापर्यंत एकूण ४ सराईत गुंडांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अशा कठोर कारवाया पुढेही सुरूच राहणार असून गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

5 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

5 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

5 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

5 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

5 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

19 तास ago