आरोग्य

चहा पिऊन पित्त वाढत तर ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी मात्र चारच्या ठोक्याला प्रत्येक घरातून चहाचा सुगंध घुमायला लागतो. चहा सगळ्यांच्या घरात तयार होतोच. पण एवढा चहा पिणे शरीरासाठी चांगले नाही. चहाला ‘स्लोकीलर’ किंवा ‘विष’ असं डॉक्टर म्हणतात. पण ‘दिल है के मानता नही’. चहा हवाच. तर मग चहा जरा वेगळ्या पद्धतीने तयार करून बघूया का? नाही.. नाही.. तुम्हाला ग्रीन टी प्यायला सांगत नाही. मान्य आहे फार कडू लागते.आपल्या देशी पद्धतीनेच चहाची तलप घालविण्याचे उपाय पाहू या.

रेग्युलर चहाऐवजी ही प्येये पिऊ शकतो.

१)आले-लिंबाचा चहा: आले-लिंबाचा चहा जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहात, तर नक्कीच चांगला. चहाची तलपही घालवतो आणि फ्रेश होण्यातही मदत करतो.

1) आलं घालून पाणी उकळून घ्या. त्यात चहाची पात, तुळशीची पाने आणि थोडी चहा पावडर घाला. अति घातली की तो कडू होतो.

२) चहा पावडर घातल्यावर जास्त उकळू नका.

३) कपात मध घ्या. त्यात चहा गाळून घ्या. आणि प्या.

२) जास्वंदाचा चहा: मान्य आहे याला चहा म्हणू शकत नाही. पण एकदा पिऊन बघा नक्की आवडेल. जास्वंदाचे फुल फार औषधी असते.

१) जास्वंदाची फुले स्वच्छ धुवून घ्या.

२) पाण्यात घालून उकळा. पाण्याचा रंग लाल होऊ द्या.

3) एका कपात मध घ्या. त्यात लिंबू पिळा आणि मग चहा गाळून ओता.

४) गरम गरम प्या.

३) ब्लॅक कॉफी: ब्लॅक कॉफी शरीरासाठी चांगली. तिच्यात हानिकारक असे काही नाही. बरेच जण ब्लॅक कॉफी पिताना दिसतात. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी अशी कॉफी चांगली.

1) गरम पाणी करून त्यात कॉफी घाला. गाळा आणि प्या.

4) गोकर्णाचा चहा: गोकर्णाच्या फुलांपासून चहा पावडर तयार करून ती ब्लू टी म्हणून बाजारात महाग विकली जाते. पण हे गोकर्ण आपल्या भारतातल्या गावागावात सापडतं.

१) गोकर्णाची फुले धुवून घ्या.

२) पाण्यात उकळून घ्या. पाणी निळे होईपर्यंत उकळा. हे फुल कडू वगैरे लागत नाही.

३) त्यात हवं तर थोडं मध घाला आणि प्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

14 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

20 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

20 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

21 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

21 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

21 तास ago