महाराष्ट्र

भगवान महावीरांचे मानवकल्याणाचे विचार आचरणात आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया

भगवान महावीरांच्या मानवकल्याणाच्या कार्याचे स्मरण करीत 

मुंबई: अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा…,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद असून मानवकल्याणाचे हे विचार आचरणात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना श्रद्धापूर्वक वंदन केले आहे. महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर होते. चिंतनशील विचारवंत ही त्यांची ओळख होती. त्यांनी मानवतावादाचे विचार मांडले. अखिल प्राणीमात्रांनी सुखी रहावे हे त्यांचे ध्येय होते. राजघराण्यात जन्मलेल्या महावीरांनी ऐहिक सुखाचा त्याग केला. त्याग, संयम, प्रेम, करुणा, शील, सदाचारासारख्या सद्गगुणांचं महत्वं जगाला समजावून सांगितलं. अडीच हजार वर्षांपूर्वी जगाला शांती, अहिंसा, बंधुत्वाची शिकवण दिली. ही शिकवण आजच्या काळात तितकीच किंबहूना अधिक महत्वाची आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago